सतिश कडार्ला,

जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली

         नक्षलवादी शासनविरोधी विविध घातपाती हिंसक कारवाया करण्यासाठी विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहीत्याचा वापर करतात व ते साहित्य सुरक्षा दलांना धोका पोहचविण्याच्या उद्देशाने गोपनियरित्या जंगल परिसरात जमिनीमध्ये पुरुन ठेवतात. अशा पुरुन ठेवलेल्या साहित्यांच्या वापर नक्षलवाद्यांकडुन नक्षल सप्ताह तसेच इतरप्रसंगी केला जातो.

        दिनांक 11/10/2022 रोजी दुपारी 12.00 वा. उपविभाग कुरखेडा अंतर्गत येत असलेल्या पोमकें मालेवाडा हद्दीमध्ये मौजा लड्डुडेरा (हेटळकसा) जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी पोलीस पथकांना नुकसान पोहचवून मोठा घातपात घडवून आणण्याचे उद्देशाने, मोठ्या प्रमाणात दारूगोळा, स्फोटके व इतर साहित्य पुरून ठेवले असल्याच्या गोपनिय माहितीच्या आधारे विशेष अभियान पथक गडचिरोली व बी.डी.डी.एस. पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना एका संशयीत ठिकाणी लपवुन ठेवलेले स्फोटके व इतर साहित्य शोधुन काढण्यात जवानांना यश आले आहे. 

        मिळुन आलेल्या डंपमध्ये 2 नग जिवंत कुकर, 2 नग क्लेमोर, 1 नग पिस्टल,2 नग वायर बंडल व पाणी साठवण्याचा 1 नग जर्मन गंज इत्यादी नक्षल साहित्य हस्तगत करुन, घटनास्थळावर मिळालेल्या मुद्देमालावर कायदेशिर कारवाई करण्यात आली. यात स्फोटकांनी भरलेले 02 नग कुकर व 2 नग क्लेमोर हे बीडीडिएस पथकाच्या मदतीने अत्यंत सतर्कतेने जागेवरच नष्ट करण्यात आले असून, इतर साहीत्य गडचिरोली येथे आणण्यात आलेले आहे. गडचिरोली पोलीस दलाकडुन पुढील कारवाई सुरु आहे. 

    सदर कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक(अभियान) श्री. सोमय मुंडे सा. मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री समीर शेख सा., मा. अपर पोलीस अधीक्षक(अहेरी) श्री. अनुज तारे सा. यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. अभियानात सहभागी असलेल्या विशेष अभियान पथक गडचिरोली व बी.डी.डी.एस. पथकाच्या जवानांचे मा. पोलीस अधीक्षक सा. यांनी कौतुक केले आहे. तसेच जिल्हाभरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आल्याचे सांगितले असून, नक्षलवादयांनी नक्षलवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com