पारशिवनी – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण चे पथक आरोपी शोध व जुगार रेड कामी फिरत असताना मिळलेल्या गोपनिय माहीती च्या आधारे स्थानिय गुन्हे शाखाचे पथकाने पोलिस थाने कन्हान परिसरातुन चोरी चे गुन्हात दोन संशयीत इसमांना ताब्यात घेऊन सखोल विचारपुस केली असता त्यानी पोस्टे कन्हान हदीतील मौजा बोरी सिगोरी. केरडी, शिवारात एम.एस.ई.बी.चे पोल वरिल अल्युमिनियम चे तार खोलुन चोरी केल्याचे कबुल केले.

      चोरीचा संपुर्णतार कन्हान येथिल एक कबाडीचे व्यावसायीकाला विकल्याचे कबुल केल्याने कबाडी व्यवसायीक यांचे ताब्यातील तिन्ही गुन्हातंर्गत चोरी केलेला अल्युमिनियम तार एकुण किमत ७७ हजारचा मुद्देमाल जप्त करून आरोपी (१)हरिष रामसिग गौतम वय१९,

 (२) प्रफुल्ल सिध्दु धुर्वे वय२२ 

दोन्ही राहणार खदान न ४ खदान कन्हान यांना अटक करून विचारपुस केल्याने त्याने कबुल केले की त्यानी पोस्टे कन्हान पो स्टे येथे दाखल गुन्हा (१) अपराध क्र१६६/२२,

(२) अपराध क्र२१०/२३

(३) अपराध क्रमाक३९४/२२ च्या

 कलम ३७९,४२७. भादवी R/ w १३६ महाराष्ट विद्युत कायदा अन्वये दाखल असुन मुद्देमाल जप्त करुन पुढील तपास करिता कन्हान पोलीसांना स्वाधिन केले.

         कन्हान पोस्टे हदीतील परिसरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात लुटमार व चोरीचे प्रमाण वाढत असल्याने नागपुर ग्रामीण पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी सदर घटनेवर आळा घालण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखा ना.ग्रा.चे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांना आदेश दिल्याने पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांनी ही बाब अत्यंत गांभिर्याने घेवुन आपले अधिनस्त असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना आदेशित करून पथके तयार केली.

      सदर कारवाई नागपुर ग्रामीण पोलिस अधीक्षक मा.विजयकुमार मगर,अप्पर पोलिस अधीक्षक राहुल माखिनिकर यांच्या मार्गदर्शनात,गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांचा आदेशानुसार , 

स्वतः पो नि ओमप्रकाश कोकाटे , पोहवा अरविंद भगत , पोना शैलेश यादव , वीरेंद्र नरड , मुकेश शुक्ला सह आदिंनी सदर कारवाई यशस्विरित्या पार पाडली .

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com