कमलसिंह यादव 

प्रतिनिधी

पारशिवनी :-तालुका तिल कन्हान पो स्टे हद्दी तिल परिसरातील पांधन रोड वरील हनुमान मंदिरातुन पितळेचा गदा आणि अगरबत्ती लावायचे पितळेचे पात्र चोरी करणारा आरोपी नामे संदीप परसराम लक्षणे राहणार गअहिवरा यास कन्हान पोलीसांनी ताब्यात घेऊन त्याचा जवळुन पितळेचा गदा आणि अगरबत्ती लावायचे पितळेचे पात्र सहित मुद्देमाल जप्त करुन पुढील कारवाई सुरु आहे .

प्राप्त झालेल्या माहिती नुसार सोमवार दि. ८ आॅंक्टोंबर ला सायंकाळी ६ ते ६:१० वाजता च्या दरम्यान तक्रारदार नामे श्यामसुंदर पिपलवा वय ६५ वर्ष रा.आंबेडकर चौक कन्हान यांचे सोबत चे कार्यकर्ता नामे भिमसिंग ठाकुर हे पुजा करण्याकरिता मंदिरात आले असता हनुमानजी च्या मुर्तीजवळ ठेवलेली पितळेचा गदा वजन अंदाजे १ किलो वजनी चा व अगबत्ती लावायचे पितळेचे पात्र असा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्यांने चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी तक्रारहार श्यामसुंदर पिपलवा यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध अप.क्र ५८२/२२ कलम ३८० भांदवि अन्वये गुन्हा दाखल करून गुन्हा चा पुढील तपास कन्हान पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार जयलाल सहारे हे करीत आरोपीचा शोध घेत असतांना पोलीस हवालदार जयलाल सहारे व इतर पोलीस कर्मचार्यांनी सीसीटीवी कैमरे च्या आधारे आरोपीचा शोध लावुन आरोपी नामे संदीप परसराम लक्षणे वय ४० वर्ष रा.गहुहिवरा वार्ड क्रमांक ३ यास ताब्यात घेऊन त्या जवळुन गदा वजन अंदाजे १ किलो व अगबत्ती लावायचे पितळेचे पात्र असा पितळाचा चा मुद्देमाल जप्त करुन आरोपीची प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान येथे वैद्यकीय तपासणी करुन अटकेबाबत ची सुचना त्याची पत्नी सौ रुचिका लक्षणे यांना देऊन अटके संबंधित सर्व रजिस्टर मध्ये नोंद करुन सदर आरोपीची अंगझडती घेऊन हवालात बंद करण्यात आले असुन पुढील तपास पोलीस हवालदार जयलाल सहारे हे करीत आहे .

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News