सैय्यद जाकिर
जिल्हा प्रतिनिधि वर्धा
हिंगणघाट :- स्थानिक कटारिया भवन येथे आमदार समीर कुनावार यांचा व्यापारी एव उद्योजक संघ हिंगणघाट यांनी उत्कृष्ठ संसदपटू पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी हिंगणघाट घाट व्यापारी संघचा विविध व्यापारी व औद्योगिक उद्योगपतींनी आमदार समीर कुणावार यांचे अभिनंदन करत स्वागत केले.
यावेळी सत्काराला उत्तर देताना आमदार कुणावार यानी हा पुरस्कार माझा नसुन आपल्या मतदार संघातील सर्व सामान्य जनतेचा असुन यामध्ये तुमचा पण बहूमूल्य वाटा असल्याची व या सत्कारामुळे नव्या जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळेल अशी भावना व्यक्त केली.
याक्षणी सुप्रसिद्ध उद्योगपति श्री.जगदीश मिहानी,श्री.राजेंद्र राठी, यांनी आमदार कुणावार यांच्या राजकीय व सामाजिक जीवनावर प्रकाश टाकत गौरव केला.
या प्रसंगी मंचावर विदर्भातील प्रसिद्ध उद्योगपति श्री.वसंत मोहता, ओम डालिया, अशोक राजपूत, डॉ.मधुसूदन गोयनका उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी व्यापारी व औद्योगिक संघाच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.