धानोरा येथील बबलू पठाण यांचे अपघातात निधन… 

भाविकदास करमनकर 

 धानोरा तालुका प्रतिनिधी 

 धानोरा येथून खंबाळा येथे काही कामानिमित्त जात असताना सुरसुंडी जवळील पुलाच्या खांबाला चार चाकी गाडीचा अपघात होऊन मृत्युमुखी पडले. तर एक जण गंभीर जखमी झाले.

            जखमींना ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे भरती करून पुढील उपचारास ब्रम्हपुरी येथे नेण्यात आले. बबलू खान पठाण शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या सुपूर्त करण्यात आला.

         10 सप्टेंबरला सायंकाळी नऊच्या सुमारास सुरसुंडी जवळ घडली त्यांना दोन मुली व पत्नी व बराच आप्तपरिवार होता. त्यांच्या जाण्याने धानोरा येथे शोक लहर पसरली आहे. त्यांच्या जवळील मित्रांनी आमचा एक चांगला मित्र गमावला अशी प्रतिक्रिया दिली आहे. आज दिनांक 11 सप्टेंबरला अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.