आंबेडकरी समाजाची दिशाभुल करणे आता अशक्य :- राजरतन मेश्राम…

          पंकज चाहांदे 

तालुका प्रतिनिधी देसाईगंज/वडसा 

देसाईगंज :- लोकसभा निवडणुकीत भाजप व कॉंग्रेस या दोन्ही पक्षांनी संविधान बदल हा विषय समोर ठेवुन आंबेडकरी समाजाची दिशाभुल केली. पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांची १० वर्षाची हुकुमशाहीची वाटचालीला लगाम लावण्यासाठी तमाम आंबेडकरी समुदायाने चळवळीची विचारधारा बाजुला ठेवुन कॉंग्रेस प्रणित महाविकास आघाडीला सरसकट मतदान केले.

          मात्र लोकसभा निवडणुकी नंतर कॉंग्रेस चा दांभिकपणा समोर आल्याने आता या समाजाची दिशाभुल करणे अशक्य असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव तथा आरमोरी विधानसभा प्रमुख राजरतन मेश्राम यांनी व्यक्त केले.

     लोकसभा निवडणुकीत आंबेडकरी विचारधारेच्या प्रतिनिधिंना लोकसभेत पोहचु द्यायचे नाही, यासाठी भाजप व कॉंग्रेस च्या प्रमुख नेत्यांनी परस्पर हातमिळवणी करुण आंबेडकरी समुदायाची दिशाभुल करण्याचे कट कारस्थान रचले.

           भाजपचे राज्यसभा खासदार अनंतकुमार हेगडे यांनी संविधान बदलण्याचे वक्तव्य केलेली चित्रफित व्हायरल करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले भारतीय संविधान पंतप्रधान नरेन्द्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यास बदलले जाईल या भितीमुळे तमाम आंबेडकरी समाजाने चळवळीचा विचार बाजुला ठेवुन सरसकट कॉंग्रेस प्रणित महाविकास आघाडी ला मतदान केले.

         यामुळे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या हुकुमशाही प्रणित धोरणांवर लगाम लावण्यास मात्र नक्किच मदत झाली. पण लोकसभा निवडनुकिनंतर निवणुकीनंतर कॉंग्रेस पक्षाचा दांभिकपणा उघड झाला, बार्टी च्या माध्यमातुन एस-सी, एस-टी, समुहाच्या विद्यार्थ्यांच्या हक्काचा शैक्षणिक निधी कमी करण्यात आला.

           विरोधी पक्ष म्हणुन कॉंग्रेसने कोणतीही भुमिका बजावली नाही, लगतच असलेल्या कर्णाटक राज्य सरकारने एस-सी, एस-टी विद्यार्थ्यांचा रिजर्व्ह असलेला ३५ हजार कोटी रुपयांचा शैक्षणिक निधी इतरत्र वळती केला.

          याठिकाणी ही कॉंग्रेसची सत्ता आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे १ आगष्ट ला एस-सी, एस-टी, समुहाचे वर्गिकरण करुण क्रिमिलेयर ची अट लागु करण्याचा असंवैधानिक निकाल जाहिर केला.

          त्याची प्रथम अंबलबजावनी कॉंग्रेसची सत्ता असलेल्या तेलंगाना व कर्णाटक सरकारने केली यावरुण कॉंग्रेस पक्ष हा आंबेडकरी समाजासह आदिवासी समाजाची दिशाभुल करत असल्याचे सत्य आता समाज खऱ्या अर्थाने ओळखु लागला आहे.

          कॉंग्रेस पक्षात राहुन काहीतरी साध्य करता येईल या लालसेने काही आंबेडकरी समाजाचे कार्यकर्ते समाजाची दिशाभुल करण्याचा प्रयत्न करत असले तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना संसदेत कधिच पोहचु न देणारा त्यांना वेळोवेळी त्रास देवुन अपमान करणारा व भारतरत्न या सन्मानापासुन वंचित ठेवणारा कॉंग्रेस चा खरा चेहरा आंबेडकरी समाज ओळखत असुन यापुढे या समाजाची दिशाभुल करणे अशक्य आहे वंचित बहुजन आघाडी चे प्रणेते ऍड.बाळासाहेब आंबेडकर संपुर्ण महाराष्ट्रात एस-सी, एस-टी व ओबिसी समुहांची मोट बांधणी करत असुन महाराष्ट्रात येत्या काळात सत्ता परिवर्तन होऊ शकते. आंबेडकरी समाजाने पराभुत मानसिकता बाळगुण कॉंग्रेसचे हस्तक असलेल्या लोकांपासुन सावध रहावे, असे आवाहन ही राजरतन मेश्राम यांनी प्रसिध्दी पत्रकातून केले आहे.