राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा भव्य पक्ष प्रवेश सोहळा आज!.. — प्रतिष्ठित नागरिक,पदाधिकारी,कार्यकर्ते व प्रसार माध्यमांना जाहिर निमंत्रण..

         राजेंद्र रामटेके 

ग्रामीण तालुका प्रतिनिधी कुरखेडा..

        भव्य पक्षप्रवेश सोहळा वासवी फंक्शन हाॅल अहेरी येथे आज पार पडत असून मोठ्या संख्येत कार्यकर्त्यांनी उपस्थित राहन्याचे आवाहन पक्षातर्फे करण्यात आले आहे.

       माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम हलगेकर यांच्या जनहितार्थ कार्यपद्धतीला अनुसरून हजारो कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे.

        राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन पक्ष प्रवेश होणार आहे.

    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष,राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील,माजी गृहमंत्री अनिल देशमुख,खासदार अमोल कोल्हे,महबूब शेख,यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पाडणार आहे..

      अहेरी विधानसभा क्षेत्रातंर्गत पाच तालुक्यातील व दक्षिण भागातील कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशिध्दी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.