चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी भंडारा
समर्थ महाविद्यालय लाखनी येथे १२ सप्टेंबर २०२४ ला दिग्विजय दिन साजरा करण्यात आला.स्वामी विवेकानंद यांनी १८९३ मध्ये शिकागो येथील जागतिक धर्म संस्थेत केलेल्या प्रतिष्ठित भाषणाची आठवण म्हणून दिग्विजय दिन साजरा करण्यात येतो.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिगंबर कापसे यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनातून महान स्वामी विवेकानंदाच्या कार्यावर प्रकाश टाकला आणि तरुणाईने त्या मार्गावर चालून स्वामीं सारखे आपले जीवन महान बनविले पाहिजे म्हणजे आपोआपच जग जिंकता येतं असा संदेश दिला.
प्रमुख अतिथी म्हणून प्रा.धनंजय गिरेपुंजे,डॉ.सुरेश बन्सपाल, डॉ.बंडु चौधरी , डाॅ.भास्कर पर्वते उपस्थित होते. आपले विद्यार्थी आपले वक्ते या उपक्रमांतर्गत रागिनी कामथे,गरदिपसिंग गिल, सोनाली खेडीकर, धनश्री लिचडे, मोनाली पडोळे, आकांक्षा नागदेवे, मानसी गिरीपुंजे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
आपला प्राध्यापक आपला वक्ता या नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत डॉ.धनंजय गभने यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासात कार्यरत राहुन आपला समाजात चांगला दर्जा निर्माण करावा असे सांगितले.
प्रा.अजिंक्य भांडारकर यांनी स्वामी विवेकानंदाप्रमाणे आपले व्यक्तिमत्व बहारदार करावे एक चांगला नागरिक होण्यासाठी चांगले विचार आचरणात आणावे असे सविस्तर सांगितले.
प्रा. युवराज जांभुळकर यांनी विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंदांचा आदर्श घ्यावा व त्याप्रमाणे तरुणांनी कृती करावी असे विचार व्यक्त केले.
प्रास्ताविक डॉ. बंडू चौधरी, संचालन डॉ.स्मिता गजभिये, तर आभार डाॅ.सुनील देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता सर्वांनी सहकार्य केले.