नविन विद्यार्थ्यांचे स्वागत तसेच माजी विद्यार्थ्यांचे स्नेहमिलन कार्यक्रम संपन्न…

      रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधि 

चिमुर :- आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमुर येथे महाविद्यालयाचा स्थापना दिनाचे औचीत्य साधुन नविन प्रवेशीत विद्यार्थ्यांचे स्वागत तसेच माजी विद्यार्थ्यांचे स्नेहमिलन कार्यक्रम संपन्न झाला.

          यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन संस्थेचे अध्यक्ष डॉ. केदारसिंग रोटेले, प्राचार्य डॉ. शुभांगी लुंगे, माजी सिनेट सदस्य किरणताई रोटेले, आयक्युएससी समन्वयक डॉ. राजु कसारे, माजी विद्यार्थी राजेंद्र मैदाने वरोरा, चंदनस्पर्श माजी विद्यार्थी संघटना सचिव डॉ. सुरेश मिलमिले मान्यवर उपस्थित होते.

            अध्यक्षस्थानावरून बोलतांना डॉ. केदारसिंग रोटेले म्हणाले की, महाविद्यालयाचे छोटेसे रोपटे वटवृक्ष झाले. पुढे उत्तम दर्जाचे नविन अभ्यासक्रम व प्लेसमेंट देवुन अ वर्ग दर्जा प्राप्त करून घेवु, महाविद्यालयाने चौथ्या नॅक मुल्यांकनात बी प्लस दर्जा प्राप्त केलेला आहे.

           याप्रसंगी डॉ. केदारसिंग रोटेले यांचे शाल व श्रिफळ देवुन गौरव करण्यात आला. अध्यक्षांनी प्राचार्य डॉ. शुभांगी लुंगे, डॉ. राजु कसारे, ग्रंथमित्र सुभाष शेषकर, लिपिक धर्मसिंग वर्मा यांचा शाल व श्रिफळ देवुन सत्कार करण्यात आला.

           याप्रसंगी रिया रॉय, मयुरी तराळे व टिम यांनी मोठ्या उत्साहात त्यांचा परिचय घेतला. गुणवंत विद्यार्थी कु. कोमल वंजारी व योगेश वरघने यांचा मोमोटो व गुच्छ देऊन गौरव करण्यात आला. स्व. चंदनसिंगजी रोटेले यांच्या प्रतिमेचे पुजन व मौन श्रध्दांज‌ली देवुन कार्यक्रमाची सुरुवात केली.

           प्रास्तविकात प्राचार्य डॉ. शुभांगी लुंगे म्हणाल्या की महाविद्यालय प्रगतीपथावर असुन स्वर्गीय अध्यक्षांनी दिलेला वारसा व त्यांच्याच विचारावर महाविद्यालय सुरु आहे. स्वागताचा कार्यक्रम रॅगींगवर उत्तम पर्याय आहे.

          सदर कार्यक्रमास प्रा. हेमंत वरघने, विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, संस्थापक यांचेसह मोठ्या उत्साहात स्थापना दिन, माजी विद्यार्थी स्नेहमिलन व नविन विद्यार्थ्यांचे स्वागत भोजनाच्या आस्वादासह उत्साहात पार पडला.