उमेश कांबळे
भद्रावती तालुका प्रतिनिधी
दि. ८ सप्टेंबरला पोलिस वेल्फेयर हाल, चंद्रपुर येथे श्री. चक्रधरस्वामी अवतार दिन कार्यक्रम हा नुकताच सम्पन्न झाला.
कार्यक्रमात महानुभाव पंथाचे चंद्रपूर् तथा गडचिरोली जिल्ह्यातून, महंत तथा भाविक भक्त उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजक चंद्रपूर – गडचिरोली जिल्हा अखिल भारतीय महानुभाव परिषदचे अध्यक्ष तथा श्रीकृष्ण मंदिर लोणारा भद्रावती चे संचालक पू.म.दिवाकरबाबा गुर्जर होते.
सदर कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थिती दर्शवित त्यांचे हस्ते स्वामीलीळा या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले.
आपल्या भाषणात त्यांनी चक्रधर स्वामी यांच्या विचारांचा आपण भान ठेवला पाहिजे.त्यांचे विचार हे आपल्या जीवनात नवी दिशा आणि नवी ऊर्जा निर्माण करण्यास मदत करते,असे सबोधित केले.
सदर मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून् प.पू.प.म. माहुरकर बाबा माहूर, न्यासबाबा मकरढोकड़ा, एकोव्यासबाबा खुटाडा, मुधोव्यासबाबा वरोरा, विनोदराज शास्त्री करणवाडी, कृष्णराज दर्यापुरकर चंद्रपुर, संतोषशास्त्री दर्यापुरकर तसेच तपस्वी गीताताई पंजाबी, वंशिका पंजाबी, आणि समस्त संत,महंत, तपस्वीनि उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोदराज शास्त्री तर आभार प्रदर्शन संतोषशास्त्री दर्यापुरकर यांनी केले.
या कार्यक्रमाचा चंद्रपुर वासीयांनी भव्य शोभा यात्रेला उपस्थिती दर्शवून संत महंत यांचा आशीर्वाद घेतला आहे.