ग्रामपंचायत कर्मचारी यांची समस्या सोडविण्यासाठी दिले गट विकास अधिकारी यांना निवेदन…

ऋषी सहारे

संपादक

आरमोरी – तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी संघटनेच्या वतीने गट विकास अधिकारी,पंचायत समिती आरमोरी यांना निवेदन देऊन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत हिस्सा किमान वेतन, राहणीमान भत्ता, भ.नि.निधी ग्रामपंचायत हिस्सा, सेवा पुस्तक अद्यावत करून मिळण्याकरिता निवेदन सादर केले.

       यावेळी सुरेश सहारे अध्यक्ष, सोमेश्वर राऊत उपाध्यक्ष, प्रितम इलमलवार सहसचिव, नरेंद्र टेंभूर्ते संघटक, मधुकर मानकर कार्याध्यक्ष, साईनाथ लेनगुरे, अरुण मांदाळे, ओमदेव कुळमेथे, महादेव मोहुर्ले, डंबाजी कलसार, अनिल कोरेकर, संदीप मंगर, रोशन दुमाने, महिला उपाध्यक्ष माधुरी इंगळे, दशरथे कोडापे इत्यादी उपस्थित होते.

             किमान वेतन ग्रामपंचायत हिस्सा २५%, ५०% व ७५% तसेच राहणीमान भत्ता, भ.नि.निधीचे ग्रामपंचायत हिस्सा आणि सेवा पुस्तक अद्यावत करून मिळालेले नाही तसेच अनेक कर्मचाऱ्यांना थकीत वेतन अद्यावत मिळालेला नाही तरी सर्व ग्रामपंचायत सचिवांना आपल्या स्तरावरून कळविण्यात यावे.

        तसेच कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची निराकरण लवकरात लवकर सोडवून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याची विनंती केली.

          उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जि.प. गडचिरोली, राज्य अध्यक्ष ग्रा.पं. कर्मचारी संघटना NGP4511 यांना प्रतीलिपी सादर करण्यात आल्याचे समजते.