नागपूर विभागीय प्रतिनिधी: ऋग्वेद येवले
साकोली:जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, भंडारा व तालुका क्रीडा संकुल समिती, साकोली यांच्या संयुक्त विद्यमानाने तालुका स्तर शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. स्पर्धे अंतर्गत घेण्यात आलेल्या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये नवजीवनच्या नवरत्नांनी बाजी मारली व जिल्हास्तरासाठी सर्व विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत.
यामध्ये 14 वर्षाखालील वयोगटांमध्ये आदित्य कापगते, विक्रम चौधरी, दिक्षा गुप्ता, निधी ब्राह्मणकर व दर्शिका पातोडे या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. तसेच वयोगट 17 वर्षाखालील तेनिष्क रिनाइत, वीर कुमार या मुलांनी तर अदिती साखरे, चेतना दिहारी या मुलींनी उत्कृष्ट कामगिरी करत उज्वल यश संपादन करून जिल्हास्तरासाठी पात्र ठरलेले आहेत.
या सर्व नवरत्नांचे ब्राह्मानंद करंजेकर शैक्षणिक परिसरातील सर्व पदाधिकारी, शाळेचे प्राचार्य मुजम्मिल सय्यद, पर्यवेक्षिका वंदना घोडीचोर, वरिष्ठ शिक्षिका भारती व्यास, प्रशासकीय अधिकारी विनोद कीरपान व सतीश गोटेफोडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून जिल्हास्तरावर यश संपादन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी या यशाचे श्रेय शाळेचे प्राचार्य, पर्यवेक्षिका, वरिष्ठ शिक्षिका, प्रशासकीय अधिकारी तसेच क्रीडा प्रशिक्षक श्रीधर खराबे, अशोक कुमार मीना, पार्वती मीना, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना दिले.