आळंदी : येथील वैभव मल्टीपल क्लिनीकचे सर्वेसर्वा डॉ.सुनिल वाघमारे यांना काव्यमित्र संस्थेच्या वतीने दिला जाणारा मानाचा राष्ट्रीय समाजसेवा पुरस्कार जाहीर झाला आहे.येत्या रविवारी दि.१८ सप्टेंबर रोजी आचार्य अत्रे रंगमंदिर पिंपरी येथे सरसेनापती बाजी पासलकर यांचे वंशज भगवानराव पासलकर आणि कार्यकारी अभियंता दिलिप पोरेडी यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे असे काव्यमित्र संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र सगर यांनी सांगितले.
जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा या प्रमाणे वैद्यकीय क्षेत्रात अविरत सेवा देणारे व नेहमीच समाजसेवेत अग्रेसर असणारे आळंदी येथील प्रसिद्ध डॉ.वाघमारे हे गेली चार पाच वर्षापासून तिर्थक्षेत्र आळंदीत वैभव मल्टीपल क्लिनीकच्या माध्यमातून वेळोवेळी गोरगरीबांची सेवा करत आहे,ते एक डॉक्टर असल्याकारणाने रात्री अपरात्री रुग्णांना योग्य व निकडीची सेवा देतात, कोविड काळात आळंदी ग्रामीण रुग्णालयात त्यांनी भरीव योगदान दिले आहे, डॉ.वाघमारे हे गेल्या कित्येक वर्षांपासून सामाजिक, धार्मिक, वैद्यकिय, तसेच इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर आहेत.धरणी मातेची सेवा म्हणून वृक्ष लागवडीचे कार्यक्रम, रक्तदान शिबीर, दिव्यांगासाठी मोफत वैद्यकीय सेवा, आरोग्य शिबीर आयोजित करत आहेत. या अविरत सेवेबद्दल डॉ.वाघमारे यांना विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.डॉ.सुनिल वाघमारे यांना काव्यमित्र संस्थेच्या वतीने दिला जाणारा मानाचा राष्ट्रीय समाजसेवा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.