प्रितम जनबंधु

संपादक

 

भंडारा :– घरात झोपलेल्या दोन भावंडांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील देव्हाडा खुर्द येथे घडली. या घटनेची माहिती होताच शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी देव्हाडा खुर्द येथे धाव घेतली आहे.

 

सुशील बलवीर डोंगरे (8) व उत्कर्ष बलवीर डोंगरे (11 ) असे मृत भावंडाचे नाव आहे. रात्री ते एकाच बिछान्यावर झोपी गेले होते. रात्री मागच्या दारातून साप आत आला व तो बिछान्यावर चढला असता त्या सापाने दोघाही भावांना दंश केला. दोन्ही भावंडाना काहीतरी चावल्याचा भास झाला. साप चावल्याचे माहित होताच दोघाही भावांना उपचारासाठी आधी तुमसर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यानंतर त्या दोनही भावांना भंडारा येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.

 

भंडारा येथे उपचारादरम्यान थोरला भाऊ उत्कर्ष बलवीर डोंगरे यांचा रात्रि मृत्यू झाला. तर भंडारा येथून धाकटा भाऊ सुशील बलवीर डोंगरे याला भंडारा येथून रात्रीच नागपूर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे देव्हाडा खुर्द गावात शोककळा पसरली आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News