प्रितम जनबंधु

संपादक

 

ब्रम्हपुरी :- तालुक्यातील आवळगाव शेतशिवरात विज पडून एका महिलेच्या जागीच मृत्यु झाला तर एक महिला गंभीर जखमी झाल्याची खळबळजनक घटना दिनांक ११सप्टेंबर २०२२ ला दुपारी २:३० वाजताच्या सुमारास घडली आहे.

 

शामल वासुदेव झोडे वय वर्षे ४७ असे विज पडून मृत्यु झालेल्या महिलेचे नाव असून ज्योती निलेश पोहनकर वय २६ असे जखमी महिलेचे नाव आहे. सदर दोन्ही महिला ह्या आवळगाव येथील रहिवाशी आहेत.

 

सविस्तर वृत्त्त असे आहे की, तालुक्यात मोठ्या प्रमाणात धनापिकाची लागवड केली जात असून धानपिक चांगल्या प्रकारे हाती यावे म्हणून धानपिकाची देखभाल केली जाते त्यातच आवळगाव येथिल नत्थुजी नरुले यानी शेतामध्ये धानपिकाची लागवड केली आहे. त्या धानपिकाच निंदन काढण्यासाठी गावातीलच काही महिला धानपिकाच निंदन काढण्यासाठी शेतावर नेले असता अचानक दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडटासह पावसाला सुरू झाली. त्यातच नरुले यांच्या शेतात निंदन काढत असलेल्या महिला शामल झोडे यांच्या अंगावर विज पडली त्यामध्ये शामलचा जागीच मृत्यु झाला. तर तिच्या शेजारी असलेली महिला ज्योती पोहनकर हिला विजेचा झटका लागला त्यामध्ये गंभीर जखमी झाली. जखमी ज्योतीला उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथे उपचारार्थ नेण्यात आले. तर मृतक शामलला उत्तरीय तासणीसाठी ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे नेण्यात आले.

 

या घटनेने आवळगाव परिसरात शोककळा पसरली असून झोडे कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सदर घटनेचा पुढील तपास संबधित पोलिस विभाग करीत आहेत.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com