रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी
चिमूर महसूल अंतर्गत तलाठी साझा क्र.१२,अन्वये मौजा टेकाडी पैकू,वडाळा – कळमगाव कडे जाणारा पांदन रस्ता क्र. २९ आहे.
या पांदन रस्त्यावरील पूल,मागील १९,२० जुलै २०२४ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे महापूर आलाय व संपूर्ण रस्ता उकळून गेला व रपटा पुल तुटून वाहून गेलाय.
सदर रोड हा सार्वजनिक बंधकाम विभाग यांचे अधिनस्त येत असून ग्रामपंचायत कळमगाव यांचे अधिकार कक्षेत आहे.
रपटा पुल व रस्ता वाहून गेल्या बाबत सार्वजनिक बांधकाम कार्यालय यांना माहिती तलाठी यांचे कडून देण्यात आली. तसेंच टेकाडी पैकू येथील अनेक शेतकरी बांधवांनी पुल व रस्ता दुरुस्तीची मागणी केली.
परंतु सदर गंभीर समस्यांची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही.पुल तुटून वाहून गेल्यामुळे,शेती हंगाम करिता लागणारे खते,अवजारे,साधन सामुग्री,नेण्यासाठी खूपच अडचण व नाहक त्रास होत आहे.
नैसर्गिक कोपातंर्गत सर्व शेतकरी हवालदिल झाले असून शासन-प्रशासनाप्रति त्यांच्यात असंतोष आहे.पुल व रस्ता समस्या बद्दल सोशल मिडिया न्यूज,दैनिक वृत्तपत्र न्यूज,द्वारा माहिती व मागणी सुद्धा केली.
परंतु सदर अधिकारी कर्तव्यात कसूर करून टाळाटाळ करताना दिसत आहे. १ आठवड्यात योग्य निर्णय न घेतल्यास शेतकऱ्यांना मोर्चा काढावे लागेल याची प्रशासनाने तसदी घ्यावी असे शेतकऱ्यांकडून इशारा देण्यात आला आहे.