महिला उद्योग वर्धिनीच्या वतीने राजमुद्रा व शिवराखीचे अनावरण करण्यात आले… — युवा सेना जिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर यांच्या हस्ते अनावरण…

 युवराज डोंगरे/खल्लार 

            उपसंपादक

आज (१२)दर्यापूर येथे नांदरून सामदा व दर्यापूर येथील महिला यांनी महिला उद्योग वर्धिनी मार्फत दर्यापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दर्यापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांनी स्वतः हातानी बनवलेली राम राखी, अलिंगण राखी,छत्रपती शिवाजी महाराज यांची राखी व राजमुद्रा अश्या अनेक तसेच ग्रामीण भागातील महिलासाठी रोजगार उपलब्ध करून देण्यात आले आहे.

              तसेच अश्या अनेक अनेक प्रकारचे उद्योग महिला उद्योग वर्धिनी मार्फत राबविल्या जातील आणि आमचा उपक्रम असाच पुढे पण चालू राहणार असे उदगार सौ आचल रायबोले प्रीती भटकर रूपा जामनिक यांनी बोलताना व्यक्त केले आहे.

           तसेच या राखीचे अनावरण व शिवसेनेचे युवा जिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर व सामदा येथील सरपंच सौ योगिता विजय हंबर्डे (चौरपगार व शिवसेना दर्यापूर तालुका समन्वयक बबनराव विल्हेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

          भूमिपूजन करतेवेळी शिवसेना दर्यापूर तालुका समन्वयक बबनराव विल्हेकर, प्रमोद धनोकार, शरद आठवले सरपंच विजय आढऊ, मोहन पाटील खरबळकार, रुपेश मोरे, डिगंबर पाटील गावंडे, पत्रकार युवराज भाऊ डोंगरे, विनोद जामनिक, भरत गावंडे व कमल रायबोले सुषमा चौरपगार स्मिता ढोके व असंख्य महिला यांची उपस्थिती होती.