युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
वंचित बहुजन आघाडी अमरावती पश्चिम जिल्हा प्रमुख पदी संजय चौरपगार यांची नुकतीच नियुक्ती जाहीर झाली असून संजय चौरपगार यांनी आपला सामाजिक कार्याचा रुबाब कायम ठेवत शहरातील नागरिकांच्या विविध समस्यांबाबत दर्यापूर नगरपालिकेला निवेदन सादर केले.
दर्यापूर शहरात गेल्या कित्येक वर्षापासून विकास कामांना गतिरोधक बसला गेला तो काढण्यासाठी विनवणी सुद्धा करण्यात आली. यासह दर्यापूर शहरातील नागरिकांना विविध रोगांची लागण सुद्धा झपाट्याने सुरू झाली असून नागरिक हे भयभीत झाले आहेत. शहरात पावसाच्या पाण्याची ,डबक्याची समस्या, रस्त्यांची दुरुस्ती, गटार व्यवस्थापन,साचलेल्या पाण्याचा योग्य निचरा संबंधी व मुख्य करून डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, शहरात जंतनाशकाची फवारणी पालिकेच्या वतीने ताबडतोब करावी.असे यावेळी निवेदनात नमूद करण्यात आले.
संजय चौरपगार यांच्या नेतृत्वात आज(१३)पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते पालिकेत निवेदन देताना एकवटले होते. यासह शहरातील विकास कामांनबाबत मुख्याधिकारी नंदू परळकर यांच्यासोबत संजय चौरपगार व पदाधिकाऱ्यांनी विविध विषयांवर चर्चा केली.
निवेदन देतांना अंकुश वाकपांजर, सदानंद नागे, आनंदवर्धन अडकणे, साहेबराव वाकपांजर अब्दुल सलीम भाई,अशोकराव दुधंडे, प्रभाकर चौरपगार, प्रवीण राजूरकर, संदीप बगाडे राजेंद्र वानखडे अतुल पाटील नळकांडे, विजू चौरपगार अनिल सोनवणे, नितीन धुराटे, रामभाऊ वानखडे, देवा गावंडे, राहुल जामनिक,प्रशांत जामनिक, भारत चौरपगार, चेतन कांबळे, सुनील नागदिवे अतुल पाटील नळकांडे प्रीतम नितोने आर्यन चोरपगार डॉ.संदीप सुशीर , दिनेश दूधंडे, उमेश कुटेमाटे,संतोष बगाडे, देवराव वाकपांजर,सुरेश वाकपांजर , कैलास थोरात,देवानंद धांडे, दामोदर तायडे, गौतम डोंगरे, डॉ.भीमराव खडे, सुनील गवळी मिथुन सावळे गजानन नाचणे, विशाल पाखरे, यश कांबळे,रितेश पडघामोड,अजय दुदंडे, प्रशिक तायडे,अक्षय गावंडे,मुरलीधर रायबर्डे,माजी सरपंच राहुल जामणीक ,शैलेश इंगळे, नितेश चोरपगार, बाळासाहेब ठोबरे सह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.