राकेश चव्हाण
तालुका प्रतिनिधी कुरखेडा
केंद्र व राज्य सरकारने सर्वसामान्य जनतेचा जीवनमान उंचावण्यासाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या असून त्या योजनांची गावागावात चर्चा करून जनतेला प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन जन सेवा हीच ईश्वर सेवा समजून कार्य करुन महाविकास आघाडी सरकारचा खोटारडेपणा जनतेला सांगा असे आवाहन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी केले.
ते कुरखेडा येथील किसान मंगल कार्यालय येथे येथे आयोजित तालुका कार्यकारणीच्या बैठकी प्रसंगी बोलत होते.
या बैठकीचे अध्यक्ष भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे,लोकसभा निवडणूक प्रमुख किसन नागदेवे,भाजपा जिल्हा महामंत्री सदानंद कुथे,भाजपा तालुका अध्यक्ष चांगदेव भाऊ फाये,तालुका प्रभारी देवराव गजभिये,उपाध्यक्ष गणपत सोनकुसरे,अल्प संख्याक मोर्चा बबलू हुसेनी,शहर अध्यक्ष सागर निरंकारी,नगरसेवक रामभाऊ वैद्य,माजी तालुकाध्यक्ष नाजूक पुराम,तालुका महामंत्री डॉ.मनोहर आत्राम,चंदकांत चौके,युवा मोर्चा अध्यक्ष उल्हास देशमुख तालुका महामंत्री विनोद नागपूरकर,देवदास सुकारे भाजपा तालुका महिला आघाडी अध्यक्षा जागरुती झोडे,महामंत्री जयश्री मडावी,माजी जी.प.सदसया गीता कुंभरे,महिला शहर अध्यक्षा कल्पना मांडवे,रुपाली कावळे,तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी भाजपा तालुका कार्यकारिणी बैठकीला उपस्थित असलेल्या भाजपा बूथ प्रमुख,शक्ती केंद्रप्रमुख व विविध आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना लोकसभा प्रमुख किसन नागदेवे व भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी मोलाचे मार्गदर्शन करून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी लोकसभेचा पराभव विसरून विरोधकांच्या खोट्या अपप्रचाराला बळी न पडता विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्याकडून होणारा दुषप्रचाराचा वेळीच खंडन करून सत्य काय ते जनतेपुढे आणण्याचे आव्हान केले.
यावेळी संघटन सक्तीचे विशेष महत्त्व जिल्हा अध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी कार्यकर्त्यांना पटवून दिले.
या बैठकीचे प्रास्ताविक भाजपा तालुका अध्यक्ष चांगदेव फाये यांनी केले तर संचालन डॉ. मनोहर आत्राम यांनी केले तर आभार जिल्हा कार्यकारिणी सदस्य दत्तू भाऊ हाडगे यांनी मानले.
तालुका कार्यकारणी बैठकीला पाचशेच्या वर भाजपा पदाधिकारी व बुथप्रमुख शक्ति केंद्रप्रमुख विविध आघाडीचे पदाधिकारी व तालुका विविध आघाडीचे पदाधिकारी व बुथ समिती वरिल सदस्य मोठ्या संख्येत उपस्थित होते.