साखरवाही ते घुग्गुस मार्गावरचे प्रवासी, प्रवासीनिवाऱ्यापासुन वंचित… — नव निर्वाचित खासदारांनी लक्ष देण्याची गरज…  — रस्ता एक, मात्र येतो काही पोलीस स्टेशनच्या हद्दीत…

     उमेश कांबळे

भद्रावती तालुका प्रतिनिधी 

          भद्रावती ते चंद्रपूर या महामार्गावरून अनेक गाव, तालुक्याकडे जाण्यसाठी रस्ते, फाटे फुटलेली आहेत. 

          मात्र या ठिकाणी रस्ता एक आणि त्याच रस्त्यालगत असलेले गाव खेडे असून जे काही पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतात आणि त्याच रस्त्यावर शालेय महाविद्यालयात शिकणाऱ्या, तसेच प्रवाश्याना थांबण्यासाठी प्रवासी निवारा एकही नाही आणि तो रस्ता औद्योगिक कंपन्या म्हणजेच इंडस्ट्रियल एरिया घुग्गुस् ला जात असून या मार्गावर रात्र वा दिवस चक्क अवजड कोळसा वाहतुकीचे ये जा सुरु असते. 

              नागपूर ते चंद्रपूर या मार्गावर साखरवाही फाटा असून तो मार्ग घुग्गुस या औद्योगिक क्षेत्राला जोडणारा आहे. आणि नेमके याच मार्गावर असलेली साखरवाही, मुरसा, बेलसनी, म्हातारदेवी खेडी गावांना जोडून धरणारा हा मार्ग. त्यात साखरवाही हे गाव पडोली पोलीस स्टेशन , मुरसा हे गाव भद्रावती पोलीस स्टेशन आणि बेलसणी हे गाव घुग्गुस पोलीस स्टेशन हद्दीत येतात.

            या मार्गावर साखरवाही, मुरसा, बेलसनी हे गावे असून त्या गावात प्रवेश कारण्यासाठी दोन रस्ते आहेत. सध्या सणासुदिचे दिवस असुन बाहेरगावाचे येणारे जानारे प्रवासी, प्रवासीनिवारा नसल्याने झाडाच्या खाली उभे राहतात.

            त्यातच शाळेच्या विद्यार्थ्यांना व शेतकरी वर्ग, पावसाळ्यात रस्त्यावरच भिजत एस टी बस ची वाट पहावी लागत असून नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यात नव निर्वाचित खासदारांनी लक्ष केंद्रित करुन् विद्यार्थ्यांना व इतर प्रवाश्याना प्रवासी निवारा उपलब्ध करुन् देण्यास मागणी होत आहे.