११ ऑगस्ट नेते परवेज मुशर्रफ जन्मदिन… — जन्म – ११ ऑगस्ट १९४३ (दरियागंज,दिल्ली) — स्मृती – ५ फेब्रुवारी २०२३ (दुबई)

कार्यालयीन प्रतिनिधि 

      दखल न्युज भारत 

       परवेज मुशर्रफ हे एक निवृत्त पाकिस्तानी लष्करी अधिकारी (जनरल), पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख व माजी राष्ट्राध्यक्ष होते. १९९९ साली पाकिस्तानचे लष्करप्रमुख असताना मुशर्रफच्या सैन्याला कारगील युद्धा मध्ये भारताकडून पराभूत व्हावे लागले. ह्यावरून मुशर्रफ व पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या दरम्यान मतभेद निर्माण झाले.

              १२ ऑक्टोबर १९९९ रोजी नवाझ शरीफने मुशर्रफना लष्करप्रमुख पदावरून काढल्याचे कळताच मुशर्रफने नवाझ शरीफ विरुद्ध लष्करी बंड पुकारले व देशाची सत्ता हातात घेतली. १५ ऑक्टोबर १९९९ रोजी मुशर्रफने देशामध्ये आणीबाणी जाहीर केली व स्वतःला पाकिस्तानच्या राष्ट्रप्रमुखपदावर नियुक्त केले. त्यांनी नवाझ शरीफला अटकेत टाकून नंतर देश सोडण्यास भाग पाडले.

           २००१ साली घेण्यात आलेल्या एका बनावटी जनमतामध्ये विजय मिळवून मुशर्रफ अधिकृतपणे पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष बनले. २००७ सालापर्यंत पाकिस्तान मधील जनतेचे मत त्यांच्या बद्दल प्रतिकूल बनले. डिसेंबर २००७ मध्ये बेनझीर भुट्टोची हत्या झाल्या नंतर अखेर १८ ऑगस्ट २००८ रोजी मुशर्रफने राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला व लंडनकडे पळ काढला.

             पुढील ४ वर्षे लंडन मध्ये राहिल्या नंतर २४ मार्च २०१३ रोजी ते पाकिस्तानात परतले. तालिबान या अतिरेकी संघटनेने मुशर्रला ठार मारण्याची धमकी दिली होती. पाकिस्तानात परतल्या नंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अटक करून त्यांच्यावर देशद्रोह, खून इत्यादी आरोपांवरून खटला भरला. परवेज मुशर्रफ यांचे वयाच्या ७९व्या वर्षी दुबईत निधन झाले.