राकेश चव्हाण
कूरखेडा तालुका प्रतिनिधी
शासकीय धान भरडाईचा कंत्राट असलेल्या राइस मिलर्स कडून आविका संस्थेचा गोडाउन मधून उचललेला धान नियोजित राइस मिल मध्ये वाहतूक न करता त्याची परप्रांतात वाहतूक होत असल्याचे प्रकरण नूकतेच उजेडात आले आहे.
या प्रकरणात आविका संस्थाची कोणतीच भूमिका व जबाबदारी नसताना त्यांचा भूमिकेवर शंका उपस्थीत करण्यात येत आहे.
त्यामूळे या कामात यापूढे पारदार्शकता राहावी याकरीता वाहतूक परवाना डि ओ वर ट्रक नंबर व ट्रकला जि पी एस प्रणालीशी जोडण्यात यावे अशी मागणी आविका संस्था संघटनेचा वतीने येथील तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी याना निवेदन पाठवत करण्यात आली आहे.
आदिवासी विकास महामंडळ आधार भूत धान खरेदी योजणा आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मार्फत राबवित असते जिल्हात सध्या खरीप हंगाम २०२३/२४ चा खरेदी मालाची उचल संबंधित मिलर्स कडून करण्यात येत आहे यावेळी मिलर्स कडून संस्थेचा गोडाउन मधून मालाची उचल करण्याकरीता डि ओ देण्यात येते.
संस्था त्याना डि ओ प्रमाणे माल देत असते यावेळी धरम काट्यापर्यंत माल व ट्रक सोबत जात संस्था मालाची डिलेवरी करते येथे संस्थेची भूमिका पूर्ण होते.
यापूढे मिलर्स धान नियोजित राइस मिल मध्ये घेऊन जाने बंधनकारक असताना त्याची परस्पर इतरत्र विल्हेवाट लावत असेल व याची जबाबदारी संस्थावर टाकण्यात येत शंका उपस्थीत करण्यात येत असेल तर हे उचित नाही व संस्थावर अन्यायकारक आहे.
त्यामूळे या व्यवहारात पारदर्शिता आणण्याकरीता डि ओ वर मालाची उचल करणार्या ट्रकचा नंबर व ट्रकला जि पी एस प्रणालीशी जोडण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदन देताना आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था संघटनेचे जिल्हाध्यक्ष हेमंत शेंदरे सदस्य महेन्द्र मेश्राम,लिलाधर घोसेकर, नरेंद्र पटने,धनुष मंगर,बंडू बोरसरे,लिलाराम घोसेकर,गिरीधर मदनकर,रामदास मस्के,हिराजी मेश्राम, देवराव खंडारकर, शामराव तूलावी, यशवंत मेश्राम,सूभाष बोरकर हजर होते.