पारशिवनी पोलीस ठाण्यात आषाढी एकादशी व मोहरम सणासंदर्भात शांतता समितीची बैठक संपन्न. 

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी ::- पारशिवनी पोलीस स्टेशन अंतर्गत मोहरम व आषाढी एकादशी सणाच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्षल पोदार यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस अधीक्षक व उपविभागीय अधिकारी रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशीनिमित्त व मोहरम निमिताने मस्जिद समितीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थितीत शांतता समितीची बैठक शुक्रवारी ५ वाजता पारशिवनी पोलीस ठाण्यात संपन्न झाली.

        त्यामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार व नियमानुसार कार्यक्रमाची माहिती घेण्यात आली,या बैठकीत पोलीस ठाण्याचे अधिकारी राजेशकुमार थोरात यांनी सविस्तर माहिती दिली. 

        या बैठकीत आषाढी एकादशी व मोहरमसाठी आयोजक पोलीस निरीक्षक राजेशकुमार थोरात,पोलीस स्टेशन पारशिवनी यांच्या अध्यक्षते खाली पार पडली.बैठकित श्री.गौरव पनवेलकर,रणजित ठाकूर,चिंतामण पुरी,सुमित कांबळे,रोशन कुंभलकर,गौरव कांबळे,बबलू शेख,रशीद बगाडे,याकुब शेख,निसार शेख,झलीम शेख,हबीब पठाण उपस्थित होते.

           शांतता समितीच्या बैठकीचे संचालन गोपनीय विभाग प्रमुख हवा पृथ्वीराज चौहान यांनी केले व सभेची रूपरेषा सविस्तर सांगितली.पो.हवा राकेश बंधाते यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.