ई पास मशीन मुळे रास्त भाव दुकानदारांना मानसिक व शारीरिक त्रास बिन पगारी फुल अधिकारी… — हा तर दुकानदारांना आत्महत्याकडे प्रवृत्त करण्याचा मार्ग –संजीव भांबोरे

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्युज भारत

भंडारा – सरकारी रास्त भाव दुकानदारांना नवीन ई पास मशीन देण्यात आल्या. परंतु सर्वर बरोबर चालत नसल्यामुळे कार्डधारकांचे फिंगर प्रिंट घेताना दुकानदारांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे असून हे दुकानदार बिन पगारी फुल अधिकारी आहेत.

        एक व्यक्तीच्या अंगठा घेण्याकरता अर्धा तास दुकानदारांना वाट पाहावी लागत आहे. याच्या फटका दुकानदारांना बसून तो आत्महत्याकडे प्रवृत्त होऊ शकतो.ज्या कॉन्ट्रॅक्टदाराला या मशीनच्या ठेका देण्यात आलेला आहे त्यांनी सर्वर बाबत बरोबर काळजी घ्यावी.

         यापूर्वी जी जुनी पास मशीन होती तिला एकच सिम कनेक्ट परंतु अशाप्रकारे त्रास देत नव्हती. परंतु आता रास्त भाव दुकानदारांना देण्यात आलेल्या नवीन मशीनला दोन सिम कनेक्ट आहेत. परंतु त्रास मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे.

          याकडे कॉन्ट्रॅक्टदाराने लक्ष केंद्रित करून दुकानदारांच्या समस्यांचे निराकरण करावे अशी मागणी सरकारी स्वस्त धान्य दुकानदार असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष संजीव भांबोरे यांनी एका पत्रकाद्वारे केलेली आहे.