![](https://www.dakhalnewsbharat.com/wp-content/uploads/2023/11/photo_2023-11-16_09-08-22.jpg)
अमान क़ुरैशी
जिल्हा प्रतिनिधि
दख़ल न्यूज भारत
सिंदेवाही तालुक्यातील पळसगांव जाट येथील रहिवासी विमल चिकटु अम्बोरकर वय 70 वर्ष ही मातारी महिला इलेक्ट्रिक अर्थिंग करंट लागल्याने मृत्यु झाल्याची घटना समोर आली.
विमल अम्बोरकर ही वृद्ध महिला आपल्या पती व मुला पासून वेगळी राहत होती. दिनांक 11/6/24 रात्रो 9 वाजता तिचा नातू दिलीप अम्बोरकर हा जेवन करुन बाहेर आला असता विमल अम्बोरकर ही महिला आँगनात पडलेली होती व तिच्या उजव्या हातात अर्थिंग चा तार होता व उजव्या पायाला जळलेले जख्मा होते.दिलीप अम्बोरकर यानी याची माहिती नातेवाईक व आजुबाजुच्या लोकांना दिली.
तसेच सिंदेवाही पोलिसांना याची माहिती देण्यात आली.ठानेदार तुषार चव्हाण व विनोद बावने,घटना स्थळी येऊन विमल अम्बोरकर या महिलेला ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे दाखल केले असताडॉक्टरानी त्या महिलेला मृत घोषित केले.
पुढील तपास सिंदेवाही पोलिस स्टेशनचे ठानेदार तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद बावने करित आहे.