डॉ.शिलू चिमूरकर यानी दिला कढोली वासीयांना आरोग्याचा मूलमंत्र…

     राकेश चव्हाण 

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

            आरमोरी उपजिल्हा रूग्णालयाचा माजी वैद्यकीय अधिकारी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता डॉ.शिलू चिमूरकर यानी आज गूरूवार रोजी कढोली येथील गूरूदेव सेवा मंडळाला भेट देत उपस्थीत गावकर्यांशी संवाद साधला व त्यांचा आरोग्याची विचारपूस करीत त्याना सूदृढ आरोग्याचा मंत्र दिला. 

             पावसाळ्यात दूषीत पाण्यामूळे उदभवणारे आजार, मच्छर मूळे होणारे कीटकजन्य आजार,सरपटणारे प्राण्याचा दंशातून उदभवणार्या आरोग्याचा समस्या याबाबद घ्यायवयाची काळजी व उपाययोजने बाबद मार्गदर्शन केले ग्रामीण भागातील महिला संसाराचा व्यस्त दिनचर्येत आरोग्याकडे दूर्लक्ष करतात त्यामूळे भविष्यात त्याना गंभीर समस्येचा सामना करावा लागतो.

            त्यामूळे महिला भगीनीनी आरोग्याचा समस्येकडे दूर्लक्ष करू वेळीच शासकीय किंवा खाजगी रूग्णालयात तज्ञ वैद्यकीय अधिकारी कडून तपासणी व औषधोपचार करून घ्यावा असे आवाहन सूद्धा यावेळी त्यानी केले याप्रसंगी गूरूदेव सेवा मंडळाचे जराते महाराज तसेच गूरूदेव सेवा मंडळाचे सभासद व गावकरी मोठ्या संख्येत हजर होते.