मानव विकास मिशन अंतर्गत बस सेवा पर्यायी मार्गाने सूरू करा…. — मूख्याध्यापक संघाचे जिल्हाधिकारी यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदन…

   राकेश चव्हाण 

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

 गडचिरोली :- सतीनदीवरील पुल खचविल्या मुळे पर्यायी रस्ता म्हणून बांधण्यात आलेला रपटा खचल्याने या मार्गावरील बस वाहतूक पुर्णत: बंद झालेली आहे त्यामूळे या मार्गाने बस किंवा अन्य साधनाने ग्रामीण भागातून तालुका मूख्यालयातील शाळा महाविद्यालयात येणार्या विद्यार्थांची मोठी गैरसोय होत त्यांचे शैक्षणिक नूकसान होत आहे.

        विद्यार्थाकरीता राबविण्यात येणारी मानव विकास मिशन योजनेची बस सेवा पर्यायी मार्गाने पूर्ववत सूरू करीत विद्यार्थांचे शैक्षणिक नूकसान टाळण्यात यावे अशी मागणी मूख्याध्यापक संघाचा वतीने उपविभागीय अधिकारी मार्फत जिल्हाधिकार्याना निवेदन पाठवत करण्यात आली आहे.

         राष्ट्रीय महामार्गाचा बांधकामा अंतर्गत येथील सतीनदीवरील पूलाला तोडण्यात आले आहे यावेळी या मार्गाची वाहतूक सूरळीत राहावी म्हणून पूलाचा बाजूनेच पर्यायी रपटा तयार करण्यात आला होता मात्र तो पहिल्याच पावसात वाहून गेल्याने या मार्गावरील सर्व वाहतूक बंद झालेली आहे नदीपलीकडील ग्रामीण भागातील मोठ्या संख्येत विद्यार्थी तालूका मूख्यालयात येतात त्यांची मोठी अडचण होत शैक्षणिक नूकसान होत आहे.

         त्यामूळे आंधळी(नवरगांव) व खेडेगांव(अंतरगाव) या पर्यायी मार्गाची योग्य ती दूरूस्ती करीत या मार्गाने मानव विकासची बस फेरी तातडीने सूरू करण्यात यावी अशी मागणी मूख्याध्यापक संघाचा वतीने निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन देताना सेवानिवृत्त प्राचार्य पि आर आकरे, प्राचार्य अविनाश गौरकार , मूख्याध्यापक सुधिर ठवरे, मूख्याध्यापक रविन्द्र अलगदेवे, मुख्याध्यापक नुतिलकंठावार हजर होते.