41 ते 50 वर्षाच्या वयात प्रत्येकजण जबाबदार नागरिक आणि कर्तव्यात कसूर न करणारा कटुंबप्रमुख म्हणून उदयास आलेला असतो.त्याला कौटुंबिक,सामाजिक,धार्मिक,शैक्षणिक,राजकीय,सांस्कृतिक,आर्थिक,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील घडणाऱ्या सर्वप्रकारच्या घडामोडीचे ज्ञान समजून घेण्यासाठी तो परिपक्व झालेला असतो. एवढेच काय तो आता केवळ कर्तव्यदक्ष म्हणून एका कुटुंबाचा ( रक्ताच्या नात्याचा कुटुंबप्रमुख म्हणून राहिलेला नसतो ) कुटुंबप्रमुख राहिलेला नसतो.तर एक संपूर्ण मानवी समाजाचा गेल्या 40 वर्षातील सुसंस्कारामुळे कर्तव्यनिष्ठ देशाचा जबाबदार नागरिक आणि अखिल विश्वाचा नागरिक म्हणून उदयास येतो.हे सर्व जगातील ज्ञात अज्ञात सर्वच महापुरुष आणि तत्ववेत्त्यांच्या आदर्श समोर ठेऊन कोणत्याही एका धर्माच्या बंधनात न राहता एका मानवता धर्माचा अनुयायी व जगाचा नागरिक बनतो.
स्वदेशात आणि जगात जेजे घडामोडी घडत असतात,”चांगल्या असो वा वाईट,त्याला तो स्वतः जबाबदार समजतो.वाईट घडत असतील तर त्या घडू न देण्यासाठी तन,मन,धनाने,त्यागाने समर्पित होण्यास एका पायावर नेहमी तत्पर असतो.त्यासाठी तो भगवान बुद्धाच्या संदेशानुसार प्रथम,”अत्त दीप भव बनतो,.
त्यानंतर तो सॉक्रेटीसच्या आदेशानुसार तो प्रथम आत्मपरीक्षण करून मग समाजपरीक्षण करतो.
तेंव्हा कुठे तो म.फुले यांच्या तत्वज्ञानानुसार शिक्षण हे सर्वांगीण सुधारणेचे प्रवेशद्वार आहे.या दारातून आत प्रवेश करून एक सुशील जबाबदार नागरिक बनतो.
त्यानंतर तेंव्हा कुठे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्याख्येतील शिक्षणानुसार तो वाघिणीचे दूध पिऊन डरकाळी फोडल्याशिवाय राहत नाही.
परंतू,या ऐन वैचारिक उमेदीच्या काळात आणि गेल्या 40 वर्षात आमचा भारतीय नागरिक धार्मिक कर्मकांडात अडकल्यामुळे,शिक्षणाचा मुळ उद्देश समजून न घेतल्यामुळे,देशातील संविधानिक संस्था समजून न घेतल्यामुळे,राज्याच्या,देशाच्या आणि जागतिक समस्या स्वतःच्या न समजल्यामुळे,शिक्षण हे माणूस बनण्यासाठीच असते,ते पैसे कमविण्याचे साधन नसते,हे समजून न घेतल्यामुळे,साम, दाम,दंड आणि भेद ही कूटनीती मानवाला दानव बनवते हे समजून न घेतल्यामुळे,जगातील वंचित आणि उपेक्षित तत्ववेत्ते आणि महापुरुष यांचे जीवन त्यांचा त्याग,संघर्ष आणि समर्पण माझ्यासाठीच होते हे समजून न घेतल्यामुळे,आज आमचा भारतीय नागरिक वयाची पन्नाशी गाठून जगाचाच काय,देशाचाच,राज्याचाच काय,समाजाचाच,कुटुंबाचाच कसातरी अर्धवट घटक बनून आलेल्या संकटांना नशीब समजून त्याला दोष देऊन मोकळा होतो. आणि यामुळेच आलेल्या नैराशामुळे एक दिवस पडत,झडत कसेतरी जीवन जगत जगतच एक दिवस या जगाचा निरोप घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून घेण्यास मोकळा होतो.
म्हणून आमच्या भारतीय नागरिकांचे आयुष्य आता केवळ 50 पर्यंतच ठरलेले आहे.
जागृतीचा लेखक
अनंत केरबाजी भवरे
संविधान विश्लेषक, औरंगाबाद,रेणापूरकर, 7875452689…