
बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपूर प्रतिनिधी
संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पादुकांना नीरा नदीच्या पाण्याने शाही स्नान घालण्यात आले.
सर्व वारकऱ्यांच्या व भाविकांच्या उपस्थितीत दही व दुधानी पादुकाला स्नान घालुन पादुकाची महापूजा व आरती करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील सराटीचा शेवटचा मुक्काम आटपून पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यातील अकलूजकडे लाखो वैष्णवांच्या साक्षीने मार्गस्थ झाली. पुणे जिल्ह्याच्या वतीने प्रशासनाने पालखी सोहळ्यास भक्तीमय वातावरणात निरोप दिला.
तुकाराम महाराज पालखी सोहळा सराटी मुक्कामी पहाटे चार वाजता काकडा आरती करण्यात आली. त्यानंतर गावकऱ्यांच्या वतीने पादुकांच्या चार पूजा संपन्न झाल्या.
सकाळी सात वाजता पुरूषोत्तम मोरे महाराज, भानुदास मोरे, अजित मोरे, संजय मोरे, अभिजित मोरे, माणिक मोरे, नितीन मोरे, बापूसाहेब मोरे महाराज, प्रल्हाद मोरे, बाळासाहेब मोरे, सोहम मोरे, रामदास मोरे, अशोक मोरे यांनी परंपरेप्रमाणे पादुकांना नीरा नदीच्या पाण्याने स्नान घातले. त्यानंतर नदीतच हजारोंच्या संख्येने जमलेल्या वैष्णवांच्या साक्षीने महापूजा व आरती करण्यात आली.
पालखी सोहळ्यासाठी आलेल्या भक्तांच्या व वारकऱ्यांच्या दर्शनासाठी पादुका सराटी येथील जिल्हा परिषद शाळेत ठेवण्यात आल्या होत्या.
यावेळी तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन पुणे जिल्हा बँक संचालक आप्पासाहेब जगदाळे, तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, पंचायत समिती सदस्य प्रदीपमामा जगदाळे, राष्ट्रवादी युवक जिल्हाअध्यक्ष आण्णासाहेब कोकाटे, उद्योजक युवराज (तात्या) जगदाळे, भारतआबा जगदाळे ,माजी सरपंच बापूसाहेब कोकाटे, महेशकाका जगदाळे, आमरभैया जगदाळे, मनोज जगदाळे, माऊली कोकाटे, शांताराम जगदाळे, अनिलभाऊ कोकाटे, दादासाहेब कोकाटे, राजेंद्रभाऊ कुरळे, ग्रामपंचायत सदस्य रोहित जगदाळे, सरपंच निशा तांबोळी, उपसरपंच संतोष कोकाटे, अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, आप्पासाहेब गुजर, प्रांताधिकारी वैभव नावडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ सुदर्शन राठोड, तहसीलदार श्रीकांत पाटील, गटविकास अधिकारी सचिन खुडे, पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी अभय तिडके, तालुका आरोग्य अधिकारी सुरेखा पोळ, सुरेश सोनवलकर, सरपंच अनिशा तांबोळी, उपसरपंच संतोष कोकाटे, विस्तार अधिकारी युनूस शेख कृषी अधिकारी संदीप घुले, तलाठी भाऊसाहेब पाठमास, ग्रामसेवक गणेश लंबाते, आदींनी दर्शन घेऊन पादुकांना पुणे जिल्ह्यातून सन्मानपूर्वक निरोप दिला.
पालखी सोहळा प्रमुखांच्या वतीने प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांचा फेटा, शाल, श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला.
संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळा सकाळी आठ वाजता पुणे जिल्ह्यातून नीरा नदीवरील पुलावरून लाखो वैष्णावांच्या व भक्तांच्या साथीने ग्यानबा तुकाराम, ग्यानबा तुकारामच्या जयघोषात सोलापूर जिल्ह्यातील अकलूजकडे मार्गस्थ झाला.
सोलापूर जिल्ह्याच्या वेशीवर खासदार धैर्यशील मोहिते पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, मदनसिंह मोहिते पाटील, नगरपरीषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे आदींनी तोफांच्या सलामीने पुष्पवृष्टी करून स्वागत केले. त्यानंतर सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात रिंगण सोहळा पार पडला.
चौकट
सराटी येथील ग्रामस्थांच्या वतीने पालखी सोहळ्यासाठी मोठी अन्नदान सेवा करण्यात आली.