बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा इंदापूर येथील मुक्काम आटवून वडापुरी व बावडा येथील दुपारी विसाव्यानंतर संध्याकाळी सराटी मुक्कामी दाखल झाली.
पालखी सोहळ्या सोबत आसणारे पोलीस प्रशासन, महसूल विभाग, आरोग्य विभाग, बांधकाम विभाग, पंचायत समिती विभाग व सर्वच पदाधिकारी आणि कर्मचारी यांच्या स्नेहभोजनाची व्यवस्था व सोय सराटी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा आध्यक्ष आण्णासाहेब कोकाटे, उद्योगक युवराज (तात्या) जगदाळे या तिघांच्या वतीने करण्यात आली.
सालाबाद परंपरे प्रमाणे पालखी निरा नदी काठावरील सराटी येथे शेवटी मुक्कामी राहते दुसऱ्या दिवशी सकाळी पादुका स्नाना नंतर पालखी सोलापूर जिल्ह्यातील अकलूज कडे मार्गस्थ होते.
पालखी सोहळ्यासाठी गेल्या आनेक वर्षापासून अन्नदान सेवा करण्याचे भाग्य आम्हाला मिळाले आसून इथून पुढेही आशीच अन्नदान करण्याची परंपरा आम्ही टिकवून ठेवण्याचे काम करीत राहीन व कधीही खंडन पडू देणार नाही.
तसेच पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना कोणत्याही आडचणी येऊ दिल्या जाणार नाहीत आशीच सेवा आमच्या हातून घडावी हनुमंत कोकाटे,आण्णासाहेब कोकाटे, युवराज जगदाळे, या तिघांनी मीडियाशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, जिल्हा अध्यक्ष आण्णासाहेब कोकाटे,उद्योजक युवराज (तात्या) जगदाळे, आनिलभाऊ कोकाटे, बापूसाहेब कोकाटे शांताराम जगदाळे, माऊली कोकाटे, काकासाहेब जगदाळे, राजेंद्रभाऊ कुरुळे, रोहित जगदाळे, राहुल जगदाळे, सचिन कोकाटे, राजू कोकाटे, लालासो काटे, किशोर कोकाटे ,आदी ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.