
ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्युज भारत
साकोली : सेंदूरवाफा येथील ओम एग्रो संचालक हर्षल कापगते यांनी शेतकऱ्यांच्या सेवेसाठी शासकीय यंत्रप्रणालीच्या “इफको” सहाय्याने नवीन तंत्रज्ञानाचे फवारणी “हॅलीड्रोन” साकोली सेंदूरवाफा क्षेत्रात उपलब्ध करून दिले.
याचे फवारणी प्रात्यक्षिके शुक्रवार १२ जुलैला कृषी अधिकारी यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आले असून आता सहज व जलदगतीने किटकनाशक फवारणीला मदत होईल असे याप्रसंगी कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.
सेंदूरवाफा ग्रामपंचायत भवन पटांगणात या “हॅली ड्रोन” शुभारंभ प्रसंगी साकोली तालुका कृषी अधिकारी सुरेंद्र झलके यांनी ओम एग्रो एजन्सी कडून सेंदुरवाफा येथे शेतकऱ्यांना पिकांवर ड्रोनच्या सहाय्याने फवारणीविषयी मार्गदर्शन करुन त्याचे फायदे समजावून दिले.
यावेळी इफको चे श्रेयस महल्ले, कापगते कृषी केंद्राचे संचालक संपत पाटील कापगते, माजी नगरसेवक ॲड. मनीष कापगते, गणेश लंजे, हर्षल कापगते हे उपस्थित होते.
शेतकामासाठी न मिळणाऱ्या मजुर वर्गाच्या समस्या, कीटकनाशके फवारणी करताना शेतकऱ्यांसोबत होणारे अपघात, साध्या फवारणी पंपाने समांतर फवारणी न होणे व समोर येणारे नवीन नॅनो तंत्रज्ञान जसे की इफकोचे नॅनो युरिया व नॅनो डिएपी हे खते वापरून हळूहळू जमिनीत द्यायची रासायनिक खते यांचा वापर कमी करण्यात आपल्या साकोली सेंदुरवाफा क्षेत्रात जमिनीची सुपीकतेला भर मिळते.
वाढवून येण्याऱ्या पिढीला हा “हॅलिड्रोन” नक्कीच वरदान ठरेल असे प्रतिपादन यावेळी ॲड. मनिष कापगते मनीषभाऊ कापगते यांनी केले. यावेळी सेंदूरवाफा क्षेत्रातील असंख्य शेतकऱ्यांनी याचे प्रात्यक्षिक पहाण्यासाठी एकच गर्दी केली होती.
हर्षल कापगते यांनी या शेतकऱ्यांसाठी अभिनव उपक्रम व लाभदायक यंत्रप्रणाली आणून शेतकरी बांधवांना एक उपहार दिल्याचे शेतकऱ्यांनी बोलून दाखविले आहे.