वणी : परशुराम पोटे
नगर परिषद शाळा क्रमांक १ मध्ये दुसऱ्या वर्गात शिकत असलेल्या चिमुकल्याचा शाळेत पडल्याने डोक्याला मार लागुन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवारी सकाळी उघडकीस आली होती. या घटनेची माहिती मिळताच वणीतील समाजसेवेत अग्रेसर असणारे उमेश पोद्दार व त्यांच्या सहकाऱ्यांनी शहरातील भोई पुरा वार्डात जाऊन पिडित पचारे परिवाराची भेट घेत त्यांचे सांत्वन करत तातडीने ११ हजाराची मदत केली.
याप्रसंगी अजिंक्य शेंडे, पियुष चव्हाण व मित्र मंडळ उपस्थित होते.