ऋषी सहारे
संपादक
कोरची मुख्यालयापासून दोन किमी अंतरावर गट ग्रामपंचायत कोचीनरा येथे माहाग्रामसभेचे तालुका अध्यक्ष झाडुराम हलामी,निजामसाय काटेंगे,व माहाग्रामसेचे पदाधिकाऱ्यांनी कोचिनारा ग्रामपंचायत कार्यालय भेट देऊन ग्रामपंचायत उपसरपंच रूपराम देवागंण ,डि.के. पटले ग्रामसेवक,पवन कोराम, देवांगन,पठान,भकत्ता ग्रामपंचायतचे सदस्य,यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेऊन , सामूहिक दावे संदर्भ मध्ये चर्चा करण्यात आली तसेच पावसाळा सुरू झाल्या गावात कोणकोणत्या प्रकारे मलेरिया, हगवण उलटी,ताप,जर, यासारखे कोणत्याही रोग वरती प्रतिबंधक नियंत्रण ठेवण्यात यावा .असा सल्लाही महा ग्रामसभेचे झाडूराम हलामी यांनी दिला तसेच काही , रोगाची लागवड झाल्यास कोरची येथील वैद्यकीय अधिकारी यांच्या संपर्क साधावा असा सल्ला दिला. तात्काळ समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले त्यावेळेस गावकरी लोक उपस्थित होते.