नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

 

 

पवनी -तालुक्यातील पालोरा येथील जिल्हा परिषद शाळेला, आयुर्वेदीक दवाखाना, अंगवाडी आणि गावाला जिल्हा परिषद सदस्य मोहन पंचभाई यांनी अचानक भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी दवाखान्यातल्या कर्मचार्यांनी आपल्या समस्या मांडल्या दवाखान्याच्या व जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात खराब पाणी शिरला आहे .मोहन पंचभाई यांनी प्रत्यक्ष पाण्यात जाऊन बघितला मुलांना कोणत्याही प्रकारचा आजार होऊ नये म्हणून शाळेच्या शिक्षकाला सूचना दिली की जेव्हा पर्यंत पाण्याचा मार्ग मोकळा होत नाही तोपर्यंत शाळा दुसऱ्या ठिकाणी भरवण्यात यावी असे आदेश दिले. व लवकरच समस्या मार्गी लावू असा आश्वासन दिला.आणि लगेच जेसीपी बोलावून पाण्याचा मार्ग मोकळा करायला सुरुवात केली .जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची भेट घेतली व विद्यार्थ्यांच्या प्रगतीची माहिती जाणून घेतली. पालोरा येथील पूर्व माध्यमिक शाळेत पहिली ते सातवीपर्यंत विद्यार्थी शिकत असून त्यांना लिहिता वाचता येते का? हे जाणून घेण्यासाठी त्यांनी भेट दिली. वर्गात जाऊन मुलांना प्रश्नः विचारले सर्व आश्चर्यचकित झाले गावातील लोकांना प्रत्यक्ष भेटून सर्वांच्या समस्या जाणून घेतल्या. लवकरच समस्या मार्गी लावीन असे जिल्ह्य परिषद सदस्य मोहन पंचभाई यांनी सांगितलं.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com