चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी
भंडारा(साकोली):- विद्यार्थी जिवनापासूनच सामाजीक कार्याची आवड असल्याने सर्वसामान्य जनतेची छोटी-मोठी कामे करीत माझ्या कार्याची ओळख म्हणून आपले अभिवादन .
सन १९८० पासुन वरिष्ठ कार्यकर्त्यांच्या सहवासात राहून राजकारणात सक्रीय होत नौकरीचा विचार न करता समाज सेवेतूनच व राज्य शासनाच्या विविध विभागातील अनेक अशासकीय समितीत विविध पदावर कार्यरत राहुन जिल्हातील तालुक्यातील व नगरातील सार्वजनीक भागातील महत्वपूर्ण कार्य केले. नगरातील रस्त्यांचे खडीकरण, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न, विदयुत, आरोग्य, शिक्षन, क्रिडा व धार्मिक कामे तसेच महत्वपूर्ण गोरगरीबाचे, सर्वसामान्यांचे विकासाचे कामे, जिवन उपयोगी समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला. केंद व राज्य शासन स्तरावरील विविध कार्य केले, “जनतेची सेवा हिच ईश्वर सेवा” समजुन कामे करण्यात मी कसल्याही प्रकारचा कसुर केला नाही. आपण माझ्यावर करीत असलेल्या विश्वासाला कधीच तडा जावू देणार नाही. आपल्या नगराचा प्रभागाचा विकास कसा करता येईल हाच माझा मुख्य उद्देश राहील, असा ध्यास घेऊनच मी येणाऱ्या न.प. निवडणुकीच्या माध्यमातुन सर्व सामान्य जनतेची सेवा करण्याची ईच्छा मनात ठेवून प्रभाग क्र.७ मधून निवडणुक लढणार आहे. तरी पण आपण मला शुभ आशीर्वाद द्यावा हीच अपेक्षा प्रभाकर सपाटे यांनी केली.