युवराज डोंगरे/खल्लार
दर्यापूर तालुक्यातील उपराई ते महिमापुर रस्त्यावर असणाऱ्या नाल्यावर याच वर्षात पुल बांधण्यात आला होता.सझर पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने एका पावसातच पुलाच्या बांधकामाची दैन्यावस्था झाली असल्याचा आरोप युवासेना विधानसभा समन्वयक प्रतीक पाटील राऊत यांनी केला आहे.
या रोडवर नुकतेच पुलाचे काम झाले होते,सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलासाठी लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असतानाही एकाच पावसात हा पुल जड वाहनांसाठी निकृष्ट ठरतोय,अमरावती ते महीमापुर बस सेवा सुरु असताना या नविन झालेल्या पुलावरून बस ड्रायव्हर बस नेत नाही,त्यामुळे उपराई मधुनच बस परत जाते.
यामुळे महीमापुर,दीघी,वडुरा येथील शाळकरी विद्यार्थी आणि प्रवासी यांचे प्रचंड हाल होत आहे.त्यामुळे शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित पाहणी करून त्या पुलावरून पाऊस आला तरीही जड वाहने गेली पाहिजे अशी व्यवस्था करावी अशी मागणी युवा सेना विधानसभा समनव्यक प्रतीक पाटील राऊत यांनी केली आहे.अन्यथा युवा सेनेच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे.