नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली -आज दिनांक 12/जुलै/2022मंगळवार ला तहसील कार्यालय साकोली येथे किसान आघाडी भाजपा साकोली तालुका यांच्या नेतृत्वात धान उत्पादक शेतकरी यांच्या विविध मागण्या घेवून तहसीलदार साकोली यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी किसान आघाडी भाजपा साकोली तालुका चे अध्यक्ष घनशाम पारधी, भाजपा जिल्हा सचिव मनीष कापगते, जिल्हा परिषद सदस्य सौ माहेस्वरी नेवारे, भाजपा तालुका अध्यक्ष लखन बर्वे , भाजपा महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष सौ इंद्रायणी कापगते, सौ भूमिता धकाते, पवन कुमार शेडे सरपंच संघटना साकोली, मधुकर कापगते, विकास कापगते , पुरुसोत्तम रुखमोडे, प्रणित पालीवाल , मेघराज मुंगुलमारे, नामदेव कापगते, संजय कापगते, रामदास समरीत, संतोष भुजाडे, चांगेस्वर कापगते, शुभाष गिरहेपुंजे, वैभव खोब्रागडे , राजू भुजाडे आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमुख मागण्या –
1. उन्हाळी हंगामात ऑनलाईन झालेल्या सर्व शेतकरी बांधवां चे धान खरेदी झाली पाहिजे.
2. मागील हंगाम (खरीप) तील बोनस ची रक्कम त्वरित द्यावी.
३. चालू कृषी कर्जदार शेतकय्रांना सानुग्रह अनुदानाची रक्कम ५००००₹ त्वरित द्यावी.
४. कृषी पंपाचे वीज बिल सरसकट माफ करावी.