पुणे जिल्हा प्रतिनिधी
पुणे – खासदार सौ सुप्रिया सुळे यांच्या सूचनेनुसार महावितरण कार्यालय,रास्ता पेठ येथे खडकवासला मतदार संघ ग्रामीण यांच्या विविध गावातील महावितरण लाईट संबंधितील समस्या विषय मिटिंग आयोजित केली होती.
महावितरण कार्यालयात विविध गावचे सरपंच,उपसरपंच,सदस्य यांच्या उपस्थितीत गावातील लाईट संबंधित येणा-या अडचणी बाबत तक्रार व निवेदन देण्यात आली.
महावितरणचे अधिकारी राठोड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन प्राथमिक तक्रार बाबत प्रत्येक ग्रामपंचायत शी संवाद साधून तात्काळ दुरुस्ती करुन द्याव्यात अशा सूचना दिल्या. यावेळी विकी अशोक मानकर माजी उपसरपंच,सांगरुण, यांनी सांगरुण येथील जरसेश्वर मंदिरा जवळ नवीन ट्रान्स्फॉर्मर बसण्याबाबत निवेदन देण्यात आले.त्यांची तात्काळ दखल घेऊन सप्टेंबर महिन्यांच्या आत मध्ये नवीन ट्रान्स्फॉर्मर बसविण्यात येईल व गावातील विविध लाईट समस्यांबाबत चर्चा करुन प्राथमिक स्तरावर दुरुस्ती कराव्यात अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
यावेळी प्रविण शिंदे सदस्य,महावितरण,पुणे बोलत असतांना म्हणाले की, महावितरण विषयक तक्रार संदर्भात खासदार सौ सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक महिन्याला मिंटिंग घेण्यात येईल.सरपंच,उपसरपंच,सदस्यांनी सूचवलेल्या कामातून किती कामे महावितरणने पूर्ण केली.याचा आढावा प्रत्येक महिन्याला घेण्यात येईल.यातून कामे पूर्ण होण्यास मदत होईल.
यावेळी प्रविण शिंदे सदस्य,महावितरण पुणे,विकास दांगट संचालक,पुणे जिल्हा बॅक,त्रिंबक मोकाशी अध्यक्ष,रा.काॅ.ख.म.सं.ग्रामीण,सौ अनिता इंगळे माजी जिल्हा परिषद सदस्या,पुणे,राठोड सर (मुख्य अभियंता,महावितरण पुणे व विविध गावचे सरपंच,उपसरपंच,सदस्य,ग्रामसेवक उपस्थित होते.