ऋषी सहारे

संपादक

 

कोरची-

           स्थानिक कोरची येथील रिअल इंग्लिश मिडिअम स्कूल मध्ये इयत्ता ५ वीत शिकत असलेल्या भावेश सुशील आडिकने याची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झालेली आहे. नुकत्याच एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेशपूर्व परीक्षेत घवघवीत यश प्राप्त करून भावेशने आपले व पालकांचे नावलौकिक केले आहे. भावेशचे पालक मूळ भंडारा जिल्ह्यातील कोंढा कोसरा येथील रहिवासी असून गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यात प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. भावेश हा सुरूवातीपासूनच चाणाक्ष व अभ्यासू आहे. उच्चशिक्षित आई सौ. मिना आडिकने व वडील सुशील आडिकने यांच्या दैनंदिन सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे व शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे त्याच्या अंगभूत बुद्धिमत्तेला अधिक झळाळी मिळून तो ही परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण झालेला आहे. त्याने प्राप्त केलेले यश हे इतरांनाही प्रेरणादायी ठरणार आहे. 

    भावेशने आपल्या यशाचे श्रेय आई – वडील, गुरुजन व कुटूंबातील नातलगांना दिलेले आहे. त्याने प्राप्त केलेल्या यशामुळे सर्वत्र त्याचे कौतुक केले जात असून कुटुंबीय, नातलग व स्नेही जनांकडून त्याच्यावर व पालकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com