पुणे जिल्हा प्रतिनिधी
खडकवासला ग्रामीण भागातील आगळंबे ते ठाकरवाडी या गावांना जोडणार्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. या भागात एकतर वाहतूकीची सुविधा उपलब्ध नव्हती. अनेक प्रयत्ना नंतर बससेवा सुरू करण्यात आली होती. परंतु या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे आता बसचालकानी देखील तक्रार केली आहे.
मागील वर्षी या रस्त्याचे खड्डे भरण्यात आले होते, परंतु हे काम देखील चांगल्या पद्धतीने न झाल्याचे पाहायला मिळत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने किमान रस्त्यांची कामे करताना त्याचा किमान दर्जा तरी चांगला ठेवावा ही नागरिकांची भावना आहे.निवडणूकी पुरते येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी किमान मुलभूत सुविधा तरी चांगल्या पुरवाव्यात ग्रामीण भागातील जनतेला अशी अपेक्षा आहे.