सुनील नंदनवार

शहर प्रतिनिधी

दखल न्युज भारत

 

आरमोरी :- गडचिरोली- नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील आरमोरी शहरातील बर्डी परिसरातील दत्त मंदिर शेजारील बस स्थानकावर आधी प्रवासी निवारा उपलब्ध होता त्यामुळे नागरिकांना पाऊस, ऊन ,वारा यापासून स्वतःचा बचाव करत तेथे थांबुन बस ची वाट बघण्याची सोय उपलब्ध होती मात्र राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामानंतर तेथील प्रवासी निवारा तोडण्यात आला व राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी प्रवासांच्या सोयीसाठी बस स्थानक बनविल्या गेले नाही त्यामुळे नागरिकांना बसची वाट बघताना पावसामध्ये पावसाचा मार खात उभे राहावे लागत आहे तर उन्हाळ्यामध्ये भर उन्हात राहावे लागते तसेच या बस स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे प्रवासाची गैरसोय होऊ नये याकरिता रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रवासी निवाऱ्याची व्यवस्था करावी अशी मागणी युवारंग तर्फे वृत्तपत्रातून करण्यात आलेली आहे

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News