प्रतिनिधी मूल:-

        महात्मा फुले यांनी 3 जुलै १८५२ ला दलीत मुलांसाठी पहिली शाळा काढली.त्यानिमित्त मुल तालुक्यातील चिरोली येथील क्रांतीबा युवा विचार मंच द्वारा मौजा चिरोली येथे सरपंच मीनल लेनगुरे यांच्या हस्ते वृक्षारोपन केले.

     यावेळी क्रांतिबा युवा मंचचे संतोष अलोने,सुभाष निकूरे,अनिल गदेकार,सुनील सोनुले,राजेंद्र शिंदे, नरेश वाघाडे,लीलाधर गुरणूले, दुर्वेश कामीडवार,विशाखा पुण्यप्रेडिवर,पूजा निकुरे,सारिका गदेकार,चंदा मंडरे, लोकेश अलोणे,मंगेश कपाट,गोकुळ मोहुर्ले, करण मोहूर्ले,माणिक गदेकार,अनिल कोटणाके पोलीस पाटील मंदातुकुम उपस्थित होते.

               पिंपळ वृक्ष कार्बन-डायऑक्साइड १००% शोषून घेतो,पिंपळाची झाडे परिसराला थंड हवामान तसेच ऑक्सिजन देऊन नैसर्गिक वातावरण ताजेतवाने ठेवण्याचे काम करतात.बऱ्याचदा 

आपणच लोकांना खुश करण्यासाठी ह्या झाडांना लावणे टाळले आणि उलट यूकेलिप्टसची (नीलगिरी) झाडे लावण्यास सुरुवात केली.  

     यूकेलिप्टस फार पटकन वाढते आणि दलदलिची जमीन कोरडी करण्यासाठी हे झाड लावले जाते.ज्यामुळे जमीन जलविहीन होते.गेल्या ४० वर्षांपासून हे वृक्ष सर्व महामार्गांवर दुतर्फा लावले गेले आहेत.त्यामुळे नैसर्गिक ताजेतवाने न राहिल्याने, उष्णता वाढून वेगाने पाण्याची वाफ होत आहे. 

 

     पिंपळाला झाडांचा राजा म्हणतात.येत्या काही वर्षांत प्रत्येक ५०० मीटर अंतरावर एक एक पिंपळ झाड लावले तर प्रदूषणमुक्त भारत होईल.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com