वणी : परशुराम पोटे
भारत स्वाभिमान ट्रस्ट व पतंजली योग समिती वणी यांचे विद्यमाने धनोजे कुणबी समाज संस्था सभाग्रुह,चिखलगांव येथे दि.१३ जुलै ला सकाळी ५:३० वाजता गुरूपौर्णिमा उत्सव आयोजित केला आहे.
तरी या कार्यक्रमास वणी येथील सर्व योग केंद्रावरील योगशिक्षक व योगसाधकांनी वेळेवर हजर राहावेत, या पवित्र दिवशी साधक आपल्या स्वईच्छेनुसार “गुरुदक्षिणा” समर्पित करू शकतात.
ज्या साधकांना या प्रसंगी विचार व्यक्त करायचे असेल, त्यांनी आज कळवावे असे आवाहन आयोजक सर्व योगशिक्षक व योगसाधक यांनी केले आहे.