कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवणी
कन्हान : – माजी उपप्रधानमंत्री बाबु जगजीवनराम द्वारे स्थापित भारतिय दलित साहित्य अकादमी व्दारे विदर्भ व जिल्हा स्तर पुरस्कार २०२४ करिता निवडी करिता निशुल्क अर्ज मागविण्यात येत आहे.
समाज आणि देशहितार्थ कार्य करणा-या विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणारे जसे, लेखक, क्रीड़ा खेडाळु, कवि, गायक, सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्य सेवा, महापुरुषाच्या विचारांचा प्रचार प्रसार करणारे व्यक्ति, देश सेवा, समाज सेवा, पर्यावरण, शेती, शेतक-याची उत्कृष्ट सेवा, थल सेना, वायु सेना, जलसेना मध्ये सेवेचे योगदान देणारे तसेच इतर योग्य व्यक्तीने निशुल्क अर्ज करण्यात यावे. प्रथम ५० निवडक व्यक्तींना दलित साहित्य अकादमीचा पुरस्काराने सन्मानित कऱण्यात येइल.
पुरस्कारात स्मृति चिन्ह, ज़िल्हास्तर प्रमाणपत्र, शाल, श्रीफल देऊन गौरन्वित करण्यात येइल. इच्छुक अर्जदाराने आपले संपुर्ण विवरण, प्रमाण पत्राच्या झेरॉक्स प्रती सह अर्ज आयोजका कडे (दि.२८) जुन २०२४ पर्यंत पाठवावे. इच्छुक अर्जदार अकादमीचे जिल्हाध्यक्ष दीपचंद शेंडे यांचेशी मोबाइल क्र. 9834353912 वर संपर्क करू शकतात.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता दीपचंद शेंडे सह रामु खडसे, धनंजय कापसिकर, प्रविण सोनेकर, अखिलेश मेश्राम, शंभु खंडारे, देवदास खड़से, रजनिश मेश्राम, रिदम शेंडे आदी परिश्रम घेत आहे.