कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवणी
कन्हान :- शहर येथील गहुहिवरा चौकात मागिल एका महिण्यापासुन एक मनोरुग्ण महिला फिरत असल्याचे सुजान नागरिकांच्या लक्षात आले. तिच्या उपचाराची सोय व्हावी म्हणुन कन्हानचे डॉक्टर कमलेश शर्मा सह मित्रानी पुढाकार घेत हितज्योति फाउंडेशनचे हितेश बंसोड़ याच्याशी संपर्क करित कन्हान पोलीस निरिक्षक उमेश पाटिल हयानी कायदेशीर पाठपुरावा करून नंददिप फॉउंडेशन यवतमाळ येथे दाखल करून त्या मनोरूग्ण महिलेस आधार मिळवुन दिला.
गरजु लोकांना सहकार्य करण्याची भावना कायम ठेवणे ही मानुसकी जीवंत असल्याचे ताजे उत्तम उदाहरण म्हणजेच कन्हान येथे एक मनोरुग्न महिला असुन मागिल एका महिन्यापासुन शहरात वावरत होती. तिला स्वत:च्या कपडयाचे ही भान राहत नसल्याने तिला जीवित हानि होवु नये किंवा कोणता ही अनुचित प्रकार घडु नये.
याकरिता कन्हान येथिल काही सुजान नागरिकांनी पुढाकार घेत कन्हान पोलीस निरिक्षक उमेश पाटिल यांना माहिती दिल्याने त्यांनी कायदेशीर पाठपुरावा त्वरित करून देण्याची हमी देत हितज्योती फाउंडेशनच्या हितेश बंसोड़ यांचे सहकार्य मांगितले असता त्यांनी होकर दिल्याने मनोरुग्ण महिलेला उपचार मिळण्याची वेगाने गती मिळुन महिलेला उपचारा करिता नंददीप फाउंडेशन यवतमाळ येथे दाखल करण्यात आले.
याकरिता रामटेक लोकसभा क्षेत्रातील नवनिर्वाचित खासदार श्यामकुमार बर्वे, माजीमंत्री राजेंद्र मुळक, चंद्रशेखर भिमटे, पोलीस निरिक्षक उमेश पाटिल, कमलेश शर्मा, आतिष मानवटकर, रोहित मानवटकर, धंंनजय कापसिकर, डॉ राखी महल्ले, रत्नमाला कोंडपनैनी, दिपा शर्मा, चेतन मेश्राम, मनोज गोंडाणें आदीनी सहकार्य केले.