संपादकीय
प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
भारत देशात धर्माच्या नावाखाली जाती व्यवस्था अंतर्गत जहाल जातीभेद आहे व जातीभेदातंर्गत अन्याय,शोषण आणि अत्याचार करणारी परंपरागत कार्यपद्धत कायम आहे हे भारत देशातील अनेक खून प्रकरणानंतर स्पष्ट होते.
जाती आणि धर्माच्या नावाखाली देशात घडवून आणणारे खून प्रकरणे आणि जाती व धर्माच्या चौकटीत द्वेषान्वये होणारे अत्याचार,अन्याय,शोषण,हे या देशातील शुद्र व अतिशुद्र म्हणजेच बहुसंख्य बहुजन समाजाला पिढ्यांनपिढ्या दर पिढ्यांना मागे नेणारे आहे,त्यांना अप्रगत ठेवणारे आहे.
याचबरोबर ओबीसी-एससी-एसटी-अल्पसंख्याक-विमुक्त भटक्या जाती जमाती-मागासवर्गीय,बहुजन समाजातंर्गत एकसंघ होत असलेल्या समाज शक्तीला काही समाजकंटकाकडून धर्मभेदातंर्गत व जातीभेदातंर्गत तोडण्यासाठी सातत्याने होत असलेले कार्य म्हणजे बहुजन समाजाला त्यांच्या हक्कापासून कायम वंचित ठेवण्याचे छडयंत्र होय हे ओळखले पाहिजे.
जातीच्या व धर्माच्या नावाखाली बहुजन समाजातील नागरिकांच्या व युवकांच्या डोक्यात जहाल द्वेषी विषारी विचारांची पेरणी करुन त्यांना एकमेकांच्या विरोधात नेहमी भडकवत ठेवण्यासाठी करण्यात येणारे कार्ये व कामे गुन्हेगारी प्रवृत्तीचे व देशविघातक कारवायाचे असल्यामुळे,”बहुजन समाजातील नागरिकांनी व युवकांनी,अन्याय-अत्याचार व शोषण करणाऱ्या जातीभेदापासून व धर्मभेदापासून स्वत:ला दूर ठेवले पाहिजे.
ज्या कामातंर्गत व कार्यातंर्गत स्वतःचे भविष्य उज्वल नसेल,संबंधीत कार्यान्वये व कामान्वये समाधान व शांती मिळत नसेल,सदर कार्यातंर्गत व कामातंर्गत परस्पर एकमेकांत बंधुता निर्माण करणारी हृदयस्पर्शी भावना नसेल व देशातील सर्व नागरिकांना न्याय देणारी संवेदनशील कृती नसेल,एकमेकांना प्रगत व उन्नत करणारे नियोजन नसेल,एकमेकांना शेजारी समजून गावातील-तालुक्यातील-जिल्ह्यातील-राज्यातील-देशातील नागरिकांना सहकार्य करणारी वैचारिक प्रगल्भता नसेल तर स्वातंत्र्याचा व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा,तद्वतच मानुष्किचा अर्थ भारत देशातील नागरिकांनी अजून पर्यंत समजून घेतलेला नाही असेच चित्र भारत देशातील नागरिकांद्वारे पुढे येतंय हे लक्षात घेतले पाहिजे..
भारत देश स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर व लोकशाही भारताच्या ७३ वर्षांनंतर,”जाती आणि धर्म भेदातंर्गत देशात होणारे खून,अत्याचार,अन्याय व शोषण बघितले तर या देशातील काही राजकारणी नेतागण व काही सामाजिक नेतागण,त्यांचे कार्यकर्तागण देशातील नागरिकांना शांततेने व समाधानाने जगू देण्याच्या व राहू देण्याच्या मानसिकतेत नसल्याचे स्पष्ट होते.
यामुळेच देशातील नागरिकांनी व युवकांनी अशा धर्मांध व जातीयवादी मानसिकतेच्या नेत्यांपासून व त्यांच्या सामाजिक चळवळींपासून व राजकीय पक्षांपासून कोसो दूर राहिले पाहिजे.
देशातील काही राजकीय,धार्मिक व सामाजिक नेत्यांचा देशात शांतता नांदू नये असा उद्देश असेल,देशातील नागरिकांना परस्पर सलोख्या अन्वये सुखी व समृद्ध होवू द्यायचे नाही असे असेल तर दाद कुणाकडे व कुठे मागायची?हा प्रश्न भयंकर सखोल असी गंभीरता निर्माण करतो आहे.
देशातील सत्ताधारी जर भांडवलदारी,धर्मांध व जातीयवादी मानसिकतेच्या शक्त्यांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष बळ देत असतील तर भारत देशाचे व भारत देशातील नागरिकांचे भविष्य प्रगल्भ आहे असे समजता येणार नाही.याचबरोबर त्यांचे स्वातंत्र्य व अभिव्यक्ती स्वातंत्र्य सुरक्षित आहे असे होत नाही.
म्हणूनच देशातील व जगातील इतिहास तज्ञांनी आणि देशातील व जगातील राज्यसत्ता प्रमुखांनी भारत देशातील लोकहितासाठी लक्ष केंद्रित करणे आवश्यक नाही असे म्हणता येणार नाही.