युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
खल्लार येथे खल्लार हायस्कुल येथे कापूस पिक परिसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात शेतकऱ्यांचे कापूस पिकात कमी खर्चात उत्पन्नात वाढ कशी करता येईल, कपाशी वरील रोग मुख्यतः बोंड सड व गुलाबी बोंड अळीवर कशी मात करावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
खारपाण पट्ट्यात सुट होणारे रासी चे स्विफ्ट व रासी 929 या वाणा बद्दल माहिती उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांना दिली.या कार्यक्रमाला खल्लार परिसरातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला.
खल्लार परिसरात मागिल वर्षी रासी स्विफ्ट हे कपाशी वाणा लावून चांगले उत्पादन घेण्याऱ्या शेतकरी बांधवांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी सीड्सचे प्रताप काळे, उमेश भगत, गौरव मानकर, राहुल मिठे ,समिर चावरे ,खल्लार ग्रा प सरपंच आरिफ शहा,युनूस शहा, सेवा सहकारी सोसायटीचे उपाध्यक्ष देवानंद पांडे प्रगतिशील शेतकरी विशाल खराडे नागोरावजी मोहोड, रणजितसिंह शेखावत, निलेश प्रकाशराव निंबाळकर, निशिकांत अढाळू, प्रफुल दाभाडे, प्रणिल अतकरणे, धनंजय खापरे रुषी काळे उपस्थित होते.