प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
विचार,कृती,कार्य व श्रम यांचा संयोग नियोजनातंर्गत प्रत्यक्ष कर्तव्यात उमटू लागला तर शक्य नसणारे ध्येय शक्य होते व अशक्य वाटू लागणारे ध्येय गाठता येते याचा अनुभव चिमूर विधानसभा निर्वाचन क्षेत्रातंर्गत मतदारांना अनेकदा आलाय.
मात्र,त्याच प्रकारचा अनुभव काॅंग्रेस पक्षाचे युवा नेते व समाज सेवक दिवाकर निकुरे यांच्या कार्याच्या व कर्तव्याच्या माध्यमातून परत येण्याची दाट शक्यता आहे.
“मानुस द्या मज मानुस द्या,भीक मागता प्रभू दिसला,… अशा प्रकारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भजनाच्या माध्यमातून जनमानसांच्या हृदयात कोरले गेलेले मानुसपण आजही प्रतिबिंबित होते.
अर्थात मानसांची सेवा व अशा सेवेच्या माध्यमातून त्यांची वैचारिक,आर्थिक,शैक्षणिक,सामाजिक,राजकीय प्रगती करणे व समताधिष्ठित समाज रचना निर्माण करुन त्यांना स्वावलंबी बनविणारे कार्य अनन्यसाधारण आहे.
हे कार्य जो कुणी निष्कलंकीतपणे भेदभाव न करता करेल तो व्यक्ती उत्तम कर्तव्याचा व कार्याचा धनी असतो किंवा बनतो.
काॅंग्रेसचे युवा नेते दिवाकर निकुरे यांनी आपल्या कार्याला व कर्तव्याला विस्तारताना किंवा सुरुवात करताना चिमूर विधानसभा निर्वाचन क्षेत्रातील सर्व जनता व सर्व मतदार माझेच आहेत हा मानस त्यांनी मनासी घट्ट केलाय.
यामुळे येणाऱ्या काळात ते प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कार्यातून जनमानसात आपले स्थान निर्माण करतील व एक मजबूत नेतृत्व म्हणून ते पुढे येतील अशी गुणवत्ता त्यांच्यामध्ये असल्याचे समोर येणार आहे.
यामुळे चिमूर विधानसभा मतदारसंघातील पराभवाचे गणित विजयात रुपांतर करण्याची त्यांची धडपड नियोजनबध्द कार्यक्षमतेची दिसून येत असल्याने ते चिमूर विधानसभेचा गड भेदण्यास कामाला लागले आहेत.
येणाऱ्या काळात चिमूर विधानसभा जिंकण्यासाठी काॅंग्रेस युवा नेते दिवाकर निकुरे हे आपल्या कार्यक्षमतेत वाढ करणार असून सर्वोतोपरी कार्याला वेग देणार आहेत..
समाजसेवक दिवाकर निकुरे यांचा वेध चिमूर विधानसभा जिंकण्याचा असल्याने ते सर्व प्रकारच्या तयारीत आहेत.