दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : १२ मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून पाळला जातो. इसवी सन १८५४ साली झालेल्या क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांना मलमपट्टी करीत हिंडणारी आद्य परिचारिका (नर्स) फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा हा जन्मदिवस आहे. फ्लोरेन्स नाईटिंगेल यांच्या निरलस रुग्णसेवेचा गौरव म्हणून जगभरात परिचारिका दिन साजरा करण्यात येतो. याच परिचारिका दिनाचे औचित्य साधत आळंदी ग्रामीण रुग्णालयात परिचारिकांचा सन्मान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आजही परिचारिका त्याच सेवाभावाने कर्तव्य करत असतात. म्हणून त्यांच्या सेवेला आमचा सलाम असे गौरोवोद्गार आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.उर्मिला शिंदे यांनी यावेळी काढले.तसेच यावेळी त्यांनी सर्व परिचारिकांना परिचारिका दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आळंदी शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सौरभ गव्हाणे म्हणाले की मोठ्या आस्थेने परिचारिका काम करीत असतात. त्यात त्यांचा कोणताही स्वार्थ नसतो. रुग्ण बरा होणे ही त्यांची पोचपावती असते.
परिचारिका दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते राहुल चव्हाण यांच्या हस्ते आळंदी ग्रामीण रुग्णालयातील परिचारिकांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी सतीश चोरडिया, मनोहर दिवाणे, रोहन कुऱ्हाडे, सौरभ गव्हाणे, निसार सय्यद, कविता बलचिम, नयना कामठे, बाळासाहेब पेठकर, महादेव पाखरे, अर्जुन मेदनकर, अनिल जोगदंड तसेच आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या परिचारिका संघमित्रा ओव्हाळ, रुक्मिणी मोरे, वर्षा गाढवे, दीपा लोंढे, सत्वशीला हामदं आदी मान्यवर उपस्थित होते.