दिक्षा कऱ्हाडे
मुख्य कार्यकारी संपादक
वैरत्व निर्माण करुन कोण कोणासी काडीमोड घेईल याचा अंदाज नसतो.आणि वैरत्वाचे सुत्र कशा प्रकारे असतय ते घटना घडवून आणणाऱ्या व्यक्तींनाच माहिती असते.
मात्र,काॅंग्रेस पक्षाचे माजी चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्यावर रात्रोच्या वेळी अनपेक्षितपणे झालेला गोळीबार सर्वांनाच बुचकळ्यात टाकणारा व हैराण करणारा ठरला.
संतोषसिंह रावत यांच्यावर गोळीबार करणाऱ्या व्यक्तींचा उदेश काहीही असला तरी त्यांची कृती निंदनीय व खालच्या स्तरावरील आहे हे मात्र नक्की.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांना मारुन कोणाला काय साध्य करायचे होते? हे चौकशीतून सामोरे येईल व चंद्रपूर पोलिस निश्चितच आरोपींचा छळा लावतील यात दुमत नाही.
मात्र,संतोषसिंह रावत यांच्यावर झालेल्या गोळीबाराने चंद्रपूर जिल्हातील राजकीय व सामाजिक मन ढवळून निघाले आहे.विशेषत: नगरपरिषद मुल वासियांच्या हृदयाचे ठोके सदर घटनेमुळे खूपच वाढलेले असणार.
रात्रोच्या वेळी जेवण झाल्यावर फिरायला जाण्याची भिती सुध्दा मुल वासियात असेल.
संतोषसिंह रावत यांच्यावर झालेल्या गोळीबाराचा उदेश काही असो,मात्र सदर संवेदनशील घटनाक्रम हा समाजमनावर आघात करणारा व धास्ती निर्माण करणारा आहे हे सुद्धा तेवढेच खरे आहे.
महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांचे ते खंदे समर्थक असल्याने त्यांचे संतोषसिंह रावत यांच्या बाबतच्या गंभीर घटनाक्रमाकडे जातीने लक्ष असणारच..
यामुळे त्यांनी चंद्रपूर पोलिसांना,शक्य तितक्या लवकर आरोपींच्या मुसक्या आवळण्याचे गर्भरीत आव्हान दिले आहे.
याच बरोबर आमदार किशोर जोरगेवार यांनी सुध्दा आरोपींना जेरबंद करण्यासाठी चंद्रपूर पोलिसांना सुचित केले आहे.